Month: March 2025

पर्यटन

कोकण रेल्वेचे होणार भारतीय रेल्वेत विलिनीकरण

.मुंबई दि. २०– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, कोकण रेल्वे महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागत असून आवश्यक गुंतवणुकीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. चार राज्य एकत्रित येऊन हे महामंडळ तयार झालं होत. त्यातल्या केरळ, कर्नाटक आणि गोवा […]Read More

देश विदेश

नागपूरमध्ये सुरु होणार राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस

नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे आता राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे १० वे कॅम्पस उभारण्यात येणार आहे. अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहून केंद्र सरकारचे आभार मानले आहे. फडणवीस यांनी लिहिले आहे की, ” […]Read More

Lifestyle

गोव्याचे खास बेबिन्का – पारंपरिक पोर्तुगीज-गोवन मिठाई

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोवा हे आपल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि स्वादिष्ट खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याची पारंपरिक मिठाई ‘बेबिन्का’ ही अत्यंत लोकप्रिय गोड पदार्थ आहे. ही पोर्तुगीज प्रभाव असलेली खास डिश असते आणि विशेषतः सणावाराला बनवली जाते. तिची खासियत म्हणजे ती अनेक स्तरांमध्ये तयार केली जाते आणि प्रत्येक थर खमंग, गोडसर आणि श्रीमंती […]Read More

पर्यटन

चिलीचे अटाकामा वाळवंट – पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण अमेरिकेतील चिली देशातील अटाकामा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात कोरडे ठिकाण मानले जाते. येथे काही ठिकाणी वर्षानुवर्षे पाऊस पडत नाही. मात्र, हे वाळवंट केवळ कोरडेपणासाठी प्रसिद्ध नाही, तर येथे असलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रांमुळेही जागतिक स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे. अटाकामा वाळवंटाचे वैशिष्ट्ये: कसे पोहोचाल? सँटियागो (चिलीची राजधानी) येथून […]Read More

विज्ञान

सुनिता विल्यम्स यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी

फ्लोरिडा, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिन्यांच्या आंतरराष्ट्रीय स्थानकातील वास्तव्यानंतर आज पहाटे आपल्या सहकाऱ्यांसह पृथ्वीवर सुखरुप परतल्या आहेत. सुनिता यांच्या या आगमनाबद्दल त्यांचे जगभरातून स्वागत आणि कौतुक होत आहे. मात्र मोठा काळ अंतराळात वास्तव्य केल्यामुळे सुनिता विल्यम्स यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. अंतराळ स्थानकात […]Read More

ट्रेण्डिंग

तब्बल २१ वर्षांनी या प्रसिद्ध अभिनेत्याचे मराठी रंगभूमीवर पुनरागमन

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीपासून हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे सचिन खेडेकर आता तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिसणार आहेत. जिगिषा अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्था एक नवीन नाटक घेऊन येत आहेत. चंद्रकांत कुलकर्णी सादरकर्ते असलेल्या ‘भूमिका’ या नाटकाद्वारे सचिन खेडेकर रंगभूमीवर पुनरागमन करणार आहेत. याच महिन्यात हे […]Read More

राजकीय

नाराज वरिष्ठ सदस्यांनी पाडले विधानसभेचे कामकाज बंद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांचा समावेश असणाऱ्या नियम २९३ अन्वयेचे दोन प्रस्ताव सभागृहात चर्चेला आले असता केवळ एक मंत्री उपस्थित असल्यानं त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला, त्यावर सत्तारूढ सदस्यांनी पाठिंबा देत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बाबत जोरदार आक्षेप नोंदवले यामुळे सभागृहाचे कामकाज आधीदहा मिनिटांसाठी आणि […]Read More

ऍग्रो

नांदेडमध्ये जापनीज मियाझाकी आंब्याचे उत्पादन, एक आंबा १० हजाराला

नांदेड, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील पारंपरिक शेती पद्धतीत आता कालानुरुप बदल होत आहेत. राज्यातील प्रयोगशील उत्साही शेतकरी आता परदेशांतील पिके घेऊन अधिक कमाई करू लागले आहेत. नांदेडमधील भोसी गावात एका तरूण शेतकऱ्याने माळरानावर दहा एकर मध्ये देश, विदेशातील फळांची बाग फुलवली आहे. यंदा प्रथमच विदेशातील झाडांना बहर आला आहे. तर आंबे बाजारात […]Read More

पर्यावरण

‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’साठी ब्रिटिश कौन्सिलकडून मुंबई विद्यापीठाची निवड

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या युवकांमध्ये हवामान बदलाविषयी व्यापक जनजागृती करून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसीत करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिलकडून ‘क्लायमेट स्कील प्रोग्राम’साठी मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. ब्रिटिश कौन्सिल आणि एचएसबीसी यांच्या अर्थ सहाय्याने मुंबई विद्यापीठात क्लायमेट स्कील प्रोग्राम राबविला जाणार आहे. ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून ब्राझील, […]Read More

पर्यावरण

पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला निधीचा 100% टक्के वापर शक्य

नवी दिल्ली, दि.19 : महाराष्ट्र राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील उभारण्यात येणाऱ्या व अस्तित्वात असलेल्या बंदर प्रकल्पांना केंद्र शासनाकडून  पर्यावरण परवानग्या योग्यवेळी मिळाल्यास सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मिळणाऱ्या निधीचा 100% टक्के वापर शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज केले.विज्ञान भवन येथे आज राष्ट्रीय सागरमाला उच्चस्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी राणे बोलत होते. याबैठकीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री […]Read More