Month: March 2025

राजकीय

धर्मादाय रुग्णालयांना आता रुग्णांची माहिती देणं बंधनकारक…

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात एक फलक लावून त्यात धर्मादाय पद्धतीचे किती रुग्ण दाखल आहेत, किती जागा रिकाम्या आहेत याची माहिती देण्यात यावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला दिले. याचे काटेकोरपणे पालन करण्याची ताकीद त्यांना देण्यात यावी असे ही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय अशा रुग्णालयाबाबत […]Read More

शिक्षण

राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू होणार

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-2026 या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढील लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी 20 मार्चला सभागृहात माहिती देत घोषणा […]Read More

राजकीय

दिशा सालियन प्रकरणी विधिमंडळात गदारोळ

मुंबई दि. २०– दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले आणि कामकाज तहकूब करावे लागले. विधानपरिषदेत दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं. माजी महापौरांसह अनेकांवर या याचिकेत राजकीय व्यक्तींवर देखील गंभीर आरोप करण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित […]Read More

देश विदेश

मायक्रोसॉफ्टआणि गेट्स फाऊंडेशनकडून डिजिटल गव्हर्नन्सच्या मॉडेलला सहकार्य

मुंबई, दि. २०:- राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणिराईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या 25 लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी घेण्याची तयारी दर्शवली. […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांना 2024 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल माहिती दिली आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम […]Read More

ट्रेण्डिंग

मुलीच्या वाढदिवसासाठी परदेशातून आला आणि जीव गमावून बसला, बायकोला अटक

आपल्या ६ वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून मेरठमध्ये आलेल्या नवऱ्याची बायकोने हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सौरभची पत्नी मुस्कान (२७) आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल (२५) यांनी गुन्हा कबूल केला असून त्यायालयाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहेमर्चंट नेव्ही अधिकारी असलेला सौरभ राजपूत २४ फेब्रुवारीला भारतात आला. त्यानंतर त्याची पत्नी मुस्कान व तिच्या बॉयफ्रेंडने […]Read More

सांस्कृतिक

एकनाथ षष्ठीचा सोहळा – लाखो भाविकांची उपस्थिती

पैठण ( छ. संभाजीनगर ) दि २० -: संत एकनाथ महाराजांच्या समाधी दिनानिमित्त फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेषतः पैठणमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संत एकनाथ महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या […]Read More

राजकीय

दगड, माती आणि वाळू उत्खननाचे आभाळ फाटले , महसूलमंत्र्यांची कबुली

मुंबई दि २० — राज्यात सुरू असलेल्या असंख्य विकास कामांसाठी दगड , माती आणि वाळू यासाठी अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं असून काही ठिकाणी तर आभाळ फाटल्याची स्थिती आहे, यासाठी संपूर्ण राज्याचे द्रोण सर्वेक्षण करून उत्खनन किती झालं याची माहिती घेऊन त्यासाठीचे स्वामित्व धन दंडासह वसूल करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री […]Read More

पर्यावरण

जागतिक चिमणी दिन: चिऊताईसाठी सहृदयतेची दारं उघडून तिचे संवर्धन करा

राधिका अघोर आपल्या सगळ्यांचं बालपण चिऊताई चिऊताई दार उघड… ह्या बालगीतापासून सुरू होतं. चिमणी भारतातल्या लोकांसाठी तरी केवळ एक पक्षी नाही, तर घराचा, अंगणाचा, आयुष्याचाचा एक अविभाज्य घटक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बाळाची ओळख ह्या चिमुकल्या गोड पक्ष्याशी होते आणि मग ती पुढे कायम राहते. आपल्या घराच्या खिडकीत, अंगणात, ओसरीत, गॅलरीत कुठेही सहज दिसणारा हा पक्षी, […]Read More