Month: March 2025

शिक्षण

ISRO कडून विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाबाबत जागरुक करण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना नवीन संधी देण्याच्या उद्देशाने, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आंतरवासीयता उपक्रम तसेच प्रकल्प प्रशिक्षणाची सुरुवात केली आहे. पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन अभ्यासक्रमाच्या देशभरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमांचा लाभ घेता येणार आहे.या क्षेत्रातील संधींसोबतच यासाठी आवश्यक शिक्षणापासूनही […]Read More

क्रीडा

केंद्र सरकारने उठवली कुस्ती महासंघावरील बंदी

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): क्रीडा मंत्रालयाने आज भारतीय कुस्ती महासंघ (WFI) वरील बंदी उठवली आहे.त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा आयोजित करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघांची निवड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि तदर्थ समिती प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत होते. २१ डिसेंबर २०२३ रोजी WFI चे अध्यक्ष झाल्यानंतर, संजय सिंह यांनी […]Read More

महिला

या झाल्या देशातील सर्वात श्रीमंत महिला

मुंबई, दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : HCL ग्रुपचे संस्थापक शिव नाडर यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीतील ४७% हिस्सा त्यांची कन्या रोशनी नाडर मल्होत्राला हस्तांतरित केला आहे. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’ नुसार, रोशनी आता ३.१३ लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत भारतीय बनल्या आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त संपत्ती फक्त मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्याकडे आहे. रोशनीपूर्वी […]Read More

ट्रेण्डिंग

एलॉन मस्कची कंपनी भारतात पुरविणारा इंटरनेट सेवा

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात आता इंटरनेट सेवाही आयात होणार आहे.भारती एअरटेलने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्ससोबत करार केला आहे. अर्थात यामुळे देशाच्या दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचण्यास मदत होईल. आज‌ स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये एअरटेलने ही माहिती दिली. स्टारलिंक लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये उपग्रहांचे जागतिक नेटवर्क […]Read More

राजकीय

राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी

मुंबई दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील महसूल प्रशासन गतिमान करण्यासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यातील ८० अधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसांचा निर्णय धडाक्यातील हा महत्वपूर्ण निर्णय असून, गेली आठ नऊ वर्षं […]Read More

महानगर

सुधीर मुनगंटीवार ठरताहेत सभागृहातील जागल्या…

मुंबई दि ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महायुतीच्या सरकारच्या काळात सरकारमध्ये ज्येष्ठ असूनही मंत्रिपद न मिळालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या आठवड्यापासूनच मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरायचं काम सुरू केले असून आपल्याकडे जी वैधानिक आयुधे उपलब्ध आहेत त्या सर्वांचा वापर करून आपण सर्वसामान्यांसाठी सरकारला जाब विचारू असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यानंतर ते रोज […]Read More

राजकीय

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानभवनात

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानभवनात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कृषीमंत्री […]Read More

महानगर

कुर्ल्यात एक नगर एक होळीचे आयोजन

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): कुर्ला पूर्व येथील नेहरुनगर या म्हाडाच्या वसाहतीमध्ये होळीचा उत्सव एकत्रितपणे साजरा व्हावा या दृष्टीने एक नगर एक होळी हा उपक्रम यंदाही करण्यात येणार आहे. यातून सर्व नागरिक एकत्र येतील तसेच पर्यावरणाची होणारी हानी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता नेहरुनगर येथील छत्रपती शिवाजी […]Read More

पर्यावरण

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या २० शहरांमध्ये भारतातल्या १३ शहरांचा समावेश,

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातल्या प्रदूषणाविषयी प्रकाशित करण्यात आलेल्या ताज्या रिपोर्टनुसार भारताची अवस्था बिकट असल्याचे दिसते आहे. जगातल्या २० सर्वात प्रदूषित शहरांपैकी १३ शहरं भारतातली आहेत. यात आसाममध्ये असलेलं बर्निहट शहर पहिल्या क्रमाकांवर आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी आयक्युआरच्या जागतिक एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 नुसार दिल्ली जागतिक स्तरावर सगळ्यात प्रदूषित शहर ठरलं […]Read More

देश विदेश

आफ्रिकेतील काँगोमध्ये झालेल्या बोट अपघातात २५ जणांचा बुडून मृत्यू

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आफ्रिकेतील काँगोमध्ये मोठा बोट अपघात होऊन २५ जणांचा सोमवारी बुडून मृत्यू झाला आहे. फुटबॉल सामना झाल्यानंतर घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाने घाला घातला आहे. दक्षिण पश्चिम कॉंगोमध्ये नदीत नाव बुडाली, त्यामध्ये २५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतामध्ये काही फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत असल्यामुळे काँगोमध्ये अशा […]Read More