Month: December 2024

राजकीय

चित्रिकरणाच्या परवानग्याना महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना!

मुंबई, दि. २६ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपट निर्मिती उद्योगाला चालना मिळावी, महाराष्ट्रात जास्तीत जास्त चित्रपटांंची निर्मिती व्हावी, त्यातून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणाच्या परवानग्या मिळणे सुलभ व्हावे आणि सुसुत्रता असावी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना लागू करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज विभागाला दिले. सांस्कृतिक कार्य […]Read More

राजकीय

पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या. […]Read More

महानगर

अखेर धनंजय मुंडे यांनी सोडले मौन, म्हणाले मारेकऱ्यांना फाशीच व्हावी

मुंबई दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांचे जे कोणी सूत्रधार असतील त्यांना फाशीच दिली जावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी असून या प्रकरणातील तपास पूर्ण करून तातडीने याची चार्ज शीट दाखल करून हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय […]Read More

ट्रेण्डिंग

YouTuber रणवीर अलाहबादिया पुन्हा संकटात, गोव्यात त्याच्याबरोबर घडला थरारक प्रसंग

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :YouTuber आणि पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहबादिया पुन्हा नव्या संकटात सापडला. त्याला आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. गोव्यात पोहत असताना बुडता बुडता वाचला आहे. त्याची गर्लफ्रेंडही यावेळी त्याच्यासोबत होती. गोव्याच्या समुद्रातील थरार त्याने सांगितला आहे. पोहत असताना हे कपल बुडणार होते. पण, एक आयपीएस अधिकारी आणि त्याच्या आयआरएस पत्नीने […]Read More

महिला

पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार, नराधमाला अटक

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने बुधवारी २५ डिसेंबरला लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सचिन सस्ते या पोलिसाला अटक […]Read More

ऍग्रो

बेदाण्यावरील जीएसटी हटवून शेतकऱ्यांना दिलासा…

सांगली दि २५– राज्यातील एक नगदी पीक म्हणून द्राक्षाकडे पाहिले जाते. या द्राक्षावर प्रक्रिया करून अनेक शेतकरी बेदाणे तयार करतात. या बेदाण्यांना भारतीय आणि परदेशी बाजारात मोठी मागणी आहे, देशाच्या अनेक प्रांतातून बेदाण्याची निर्यात केली जाते. प्रक्रिया केलेला बेदाणा अन्न या कॅटेगिरीमध्ये येत असल्यामुळे आजपर्यंत स्टोरेज मालावर पाच टक्के आणि कोल्ड स्टोरेज बेदाण्यावर अठरा टक्के […]Read More

महानगर

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण

मुंबई दि २५– दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील टप्पा १ च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली होती. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे.याशिवाय, […]Read More

ऍग्रो

राज्यातील शेतकर्‍यांना मिळणार दिवसा वीज मोफत

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नवनियुक्त सरकार शेतकरी वर्गासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेताना दिसत आहे. राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्या १२ सोशल मिडिया प्रोफाईल्स विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियाचा गैरवापर करत नेत्यांवर असंविधानिक भाषेत टिका करणारी अकाऊंट्स आता कायद्याच्या निशाण्यावर असणार आहेत. नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर आता सायबर गुन्ह्यासंदर्भात सरकारने काही पावलं उचलली आहेत. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट व व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या 12 प्रोफाईलविरोधात […]Read More

देश विदेश

पाकिस्तानचा अफगाणिस्तानात हवाई हल्ला

इस्लामाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक समस्यांनी ग्रस्त पाकीस्तानला सतत दुसऱ्यांवर कुरघोडी करण्यातच स्वारस्य असल्याचे दिसते. देशातील नागरिक महागाईच्या समस्येने त्रस्त असताना पाकीस्तान सरकार शेजारील अफगाणिस्तानवर हल्ला करत आहे. पाकिस्तानने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानी तालिबानच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील डोंगराळ भागात हे […]Read More