Month: December 2024

ट्रेण्डिंग

उपराजधानीत वर्षभरात तब्बल १४१ कोटींची सायबर फसवणूक

नागपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे देशातील आर्थिक व्यवहार सुलभ झाले असले तरीही याचा गैरवापर करत सर्वसामान्यांना लुबाडणाऱ्या भामट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १४१ कोटींना गंडा घातला आहे. सायबर पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर १३ हजारांवर सायबर फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती नागपूर पोलिसांनी […]Read More

देश विदेश

राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास होऊ शकतो 5 लाख रुपये दंड

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करणार आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची नावे, छायाचित्रे आणि राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर करणाऱ्या कायद्यातील शिक्षेमध्ये वाढ करून 5 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचवेळी दोन वेगवेगळ्या मंत्रालयांचे दोन संबंधित कायदे एकत्र करून […]Read More

ट्रेण्डिंग

रायपाटण येथे सापडला शिवकालीन अनमोल ठेवा

राजापूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. रायपाटण येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी फारशी रहदारी नसलेल्या येरडव ते अणुस्कुरा या सुमारे तीन-चार किमी लांबीच्या ऐतिहासिक शिवकालीन पायवाटेची श्रमदानाने स्वच्छता केली. त्यातून, या शिवकालीन […]Read More

Lifestyle

खमंग चाट कसा बनवायचा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चणे हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असून त्यात उर्जेचा खजिना दडलेला आहे. चण्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. चना चाट बनवायला सोपा आहे आणि कमी वेळेत तयार होतो. चला जाणून घेऊया चना चाट बनवण्याची सोपी रेसिपी. चना चाट बनवण्यासाठी साहित्यभिजवलेले काळे हरभरे – १ वाटीकांदा बारीक चिरून – १/४ […]Read More

देश विदेश

चीन बांधतोय जगातले सर्वात मोठे धरण, भारतावर होणारा परिणाम वाचा

चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याच्या तयारीत आहे. या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या उभारणीसाठी जिनपिंग सरकारने मान्यता दिली आहे. हे धरण तिबेट पठाराच्या पूर्व भागात बांधणार आहे. चीनचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरच काम सुरू होणार आहे. याचा परिणाम भारत आणि बांग्लादेशातील लाखो लोकांवर होऊ शकतो. भूकंप आणि पुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे […]Read More

राजकीय

डॉ मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे काल एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मनमोहन सिंग यांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजे तिरंग्यात लपेटून त्यांना मानवंदना देण्यात आली. मनमोहन यांचे पार्थिव उद्या काँग्रेस […]Read More

मराठवाडा

आता धाराशिवमध्ये सरपंचाला जाळून मारण्याचा प्रयत्न

धाराशिव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाईचे सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर हल्ला करत पेट्रोलचे फुगे टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यात सरपंचांबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली असून प्रसंगावधान साधून सरपंचानी आपला बचाव केला. ही घटना कळताच पोलिसांनी घटना स्थळाला भेट देऊन वेगाने तपास सुरू […]Read More

राजकीय

‘राजकोट’ मध्ये शिवाजी महाराज पुतळा उभारणीला सुरुवात…

सिंधुदुर्ग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला पुन्हा नव्याने सुरवात झाली आहे. तब्बल 60 फूट उंचीचा नवा पुतळा राजकोट किल्ल्यावर उभारला जाणार आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार हे हा पुतळा उभारणार आहेत . हा पुतळा बसवण्यासाठी तीन मीटर उंचीचा चौथरा बांधून त्यावर पूर्णाकृती पुतळा उभारला […]Read More

ऍग्रो

ढगाळ वातावरणामुळे हरभरा पीक धोक्यात, शेतकरी चिंतेत…

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेले हरभरा पीक धोक्यात आले आहे यामुळे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पिंपळगाव रेणुकाई परिसरात सुमारे 19 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आलीय. मात्र, भोकरदन तालुक्यात मागील 2/3 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी देखील […]Read More

ऍग्रो

बोधबोडन गावाने टाकली कात ! 2020 पासून एकही आत्महत्या नाही.

यवतमाळ दि. २७ (आनंद कसंबे) : यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे गाव संपूर्ण जगभर कुप्रसिद्ध झालं ते शेतक-यांच्या आत्महत्यांसाठी. 2003 ते 2020 पर्यंत अडीच हजार लोकसंख्या असलेल्या बोथबोडन गावातील 29 शेतक-यांनी आत्महत्या केल्या होत्या .हे गाव इतकं प्रसिद्ध झालं होतं की तिथे योगगुरु श्री श्री रविशंकर महाराज यांच्यापासून तर राहुल गांधी , सोनिया गांधी पासून नितीन […]Read More