Month: December 2024

राजकीय

लडाखमध्ये स्थानिक लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 95 टक्के आरक्षण

लेह, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने लडाखमधील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचे मान्य केले आहे. लडाखचे अपक्ष खासदार हनीफा जन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. हनिफा जन म्हणाले, “केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेह एपेक्स बॉडी (LAP) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स (KDA) च्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली, ज्यामध्ये आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला. […]Read More

पर्यटन

हिरव्या चहाच्या बागा, भव्य टेकड्या : उटी

उटी, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विस्तीर्ण हिरव्या चहाच्या बागा, भव्य टेकड्या, आकर्षक चर्च आणि विदेशी वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी ओळखले जाणारे, उटी हे भारतातील आणखी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तामिळनाडूमधील हे डोंगरी शहर ऑक्टोबर ते जून या महिन्यांमध्ये उत्तम प्रकारे अनुभवता येते. एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.Known for […]Read More

राजकीय

महायुतीचा सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज लगेचच महायुतीच्या वतीने सत्ता स्थापनेसाठीचा दावा राज्यपालांकडे सादर करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे शिफारस पत्र देऊन त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावे अशी विनंती केली. महायुतीचे तिन्ही नेते देवेंद्र […]Read More

देश विदेश

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर बुधवारी सकाळी एका व्यक्तीकडून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. ही घटना घडली तेव्हा सुखबीर सिंग बादल हे त्यांना मिळालेल्या धार्मिक शिक्षेमुळे अमृतसर येथील सुवर्ण मंदिराबाहेर सेवादार म्हणून सेवा करत होते. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या सावधगिरीमुळे सुखबीर […]Read More

राजकीय

फडणवीसांच्या निवडीसाठी भाजपाने केले सोशल इंजिनियरिंग

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून तब्बल दहा दिवस उलटल्यानंतर अखेर अकराव्या दिवशी आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन त्यात अपेक्षेनुसार देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. मात्र ही निवड करताना भाजपाने सोशल इंजीनियरिंग चा प्रयोग केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे . केंद्रीय निरीक्षक विजय रूपानी […]Read More

राजकीय

अखेर तिढा सुटला! देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतीत बरीच खलबतं सुरू होती. एकनाथ शिंदे यांनी माघार घेत आपण मुख्यमंत्री पुन्हा होणार नसल्याचे सांगत भाजपच्या हाती निर्णय सोपवला. त्याप्रमाणे भाजपने निर्णय घेत देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवड निवड केली आहे.मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक बुधवारी मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

भारतीय नौदल दिन : शं नो वरुण: स्वदेशीकरणातून नौदलाचे सामर्थ्य

राधिका अघोर भारतीय नौदलाच्या पराक्रमाचे स्मरण आणि गौरव करण्यासाठी, दरवर्षी चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. भारतीय सैन्यदलांनी लढलेल्या कठीण युद्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात ‘ऑपरेशन ट्रायडंट’ मध्ये भारतीय नौदलाने अतुलनीय पराक्रम गाजवत, पाकिस्तानच्या पीएनएस खैबर या मोठ्या युद्धनौकेसह, चार युद्धनौका नष्ट करत, शेकडो पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवलं. नौदलाच्या […]Read More

विदर्भ

चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात जाणवले भूकंपाचे धक्के

चंद्रपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूर- गडचिरोलीसह दक्षिण भारतात आज सकाळी 7.23 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार हा भूकंप रीक्टर स्केलवर 5.3 एवढ्या मोठ्या क्षमतेचा असल्याची पुष्टी झाली आहे. संपूर्ण गोदावरी नदी खो-यात कमी-अधिक प्रमाणात असे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या दशकातला हा सर्वाधिक […]Read More

क्रीडा

स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा विवाह निश्चित

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकणार आहे. ती हैदराबादमध्ये राहणाऱ्या व्यंकट दत्ता साईसोबत २२ डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. व्यंकट हे पॉसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी सोमवारी रात्री लखनऊमध्ये सांगितले – ‘दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत होते, परंतु सर्व काही एक महिन्यापूर्वीच […]Read More

राजकीय

फडणवीस – शिंदे यांची झाली भेट, मंत्रिमंडळ स्थापनेला वेग

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर आणि दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तब्बल चार दिवसांनी आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर भेट झाली. यात मंत्रिमंडळ स्थापने संदर्भातील रखडलेले विषय मार्गी लागल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रीपदावरती सांगितलेला दावा गेल्या आठवड्यात […]Read More