Month: November 2024

विज्ञान

भूकंप, ज्वालामुखी, भूस्खलनाचा Alert देणारा ISRO चा उपग्रह लवकरच होणार

श्रीहरिकोटा, दि.१२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो पुढील वर्षी जगातील सर्वात शक्तिशाली असा निसार हा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह अवकाशातूनच पृथ्वीवरील भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक किंवा भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा आगाऊ इशारा देणार आहे.निसार हा उपग्रह इस्रोने अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या सहकार्याने विकसित केला आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी […]Read More

देश विदेश

वेबसिरिजमधून उलगडणार RBI ची ९० वर्षांची वाटचाल

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय बॅंकींग व्यवस्थेची शिखर bank असलेल्या रिझर्व्ह बँकेचा स्थापनेपासूनचा ९० वर्षांचा प्रवास आता वेबमालिकेच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. स्टार इंडियाकडून या वेबमालिकेची निर्मिती केली जाणार आहे.रिझर्व्ह बँकेचा ९० वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या या वेबमालिकेत, मध्यवर्ती बँकेचे ध्येय आणि धोरणे मांडण्यात येतील. रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानुसार, पाच भागांची वेबमालिका बनविली जाणार […]Read More

राजकीय

शिवसेना नेते राजन शिरोडकर यांचे निधन

मुंबई, दि. १२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे. शिवसेना नेते राजन शिरोडकर यांचे आज निधन झालं. मनसेच्या वाटचालीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले होते. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांमध्ये त्यांना मानणारे लोक होते. शिरोडकर यांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

अलविदा विस्तारा! विस्ताराचे शेवटचे फ्लाईट दिल्लीला रवाना

देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने सोमवारी ११ नोव्हेंबरला शेवटचे उड्डाण केले. एअर इंडियामध्ये विलीन होण्यापूर्वी विस्ताराचे शेवटचे फ्लाईट दिल्लीला रवाना झाले. विस्तारा ही विमान वाहतुक कंपनी मंगळवारी (ता.12) एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. 2013 मध्ये टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्ससह संयुक्त उपक्रम करून, पुन्हा विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि 9 जानेवारी 2015 रोजी विस्ताराने […]Read More

सांस्कृतिक

विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न

पंढरपूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्तिकी एकादशीच्या पावन प्रसंगी विविध भागातील भाविकांनी मोठ्या उत्साहात विठुरायाचे दर्शन घेतले. विधिवत पूजा-अर्चा करत भाविकांनी श्रद्धेने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला. पंढरपूर मंदिरात आज विशेष पूजा आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. विठोबा-रुक्मिणी मंदिरात महापूजेचा कार्यक्रम संपन्न ML/ML/PGB12 Nov 2024Read More

देश विदेश

खलिस्तानी अतिरेक्याकडून अयोध्येतील राममंदीर उडवण्याची धमकी

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने एक नवीन व्हिडिओ जारी केला असून अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये हा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तो राम मंदिराला लक्ष्य करण्याबाबत बोलत आहे. दहशतवादी पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, – […]Read More

महानगर

दिव्यांग मतदारांची प्रत्येक मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): विधानसभा निवडणूकीत मुंबई कार्यक्षेत्रातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आणि प्रत्येक केंद्रावर ‘व्हीलचेअर’ तसेच मदतीसाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण १७ हजार ५४० आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ६ हजार ३८७ असे मिळून एकूण […]Read More

शिक्षण

आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत मुंबई विद्यापीठाचा क्रमांक वधारला

क्वाकरेली सायमंड ( क्यूएस) यांनी नुकतीच आशियाई युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचे रॅंकींगमध्ये दिसून आले आहे. मुंबई विद्यापीठाने गतवर्षीच्या तुलनेत सर्वच निकषात मोठी सुधारणा करत 291 ते 300 या बँडमधून बाहेर पडत थेट 245 क्रमांकावर झेप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

अजितदादांनी केली आपल्या निवृत्तीच्या वयाची घोषणा

बारामती, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोखठोक भूमिका घेऊन परखडपणे बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या राजकारणातील निवृत्तीच्या वयाबाबत महत्त्वाची माहिती दिली. बारामतीमधल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी आपण निवृत्त कधी होणार यावरही भाष्य केलं आहे. ‘साहेब कधी थांबले? मी साहेबांचं ऐकायचं ठरवलं आहे. साहेब 85 ला थांबतील, […]Read More

कोकण

रत्नागिरीतील एक हजारहून अधिक हापूस बागायतदारांनी केली GI नोंदणी

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी, कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे.रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला ३ वर्षापूर्वी ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला […]Read More