Month: October 2024

राजकीय

महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढती नाहीत , चेन्नीथला यांना विश्वास

मुंबई, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नाही त्यामुळे आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणारच नाहीत, असा विश्वास आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काँग्रेस पक्ष कार्यालय टिळक भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी नेते नाना पटोले आणि वर्षा गायकवाड […]Read More

राजकीय

राज्यात भाजपाच्या १०० तर मोदींच्या ८ सभा

मुंबई,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली रणनीती आखली असून राज्यभर भाजपचे नेते शंभर सभा घेणार आहेत, त्यापैकी आठ सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तर २० सभा अमित शहा यांच्या असणार आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या राज्यभरात ५० सभा होणार आहेत त्यात मोदींच्या आठ अमित शहा यांच्या वीस , योगी आदित्यनाथ यांच्या […]Read More

देश विदेश

दहशतवाद्यांचा खात्मा केला AI च्या मदतीने, अखनूरमधल्या यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये सोमवारी लष्कराच्या ताफ्यावर ॲम्ब्युलन्सवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. याबाबत लष्कराने मोठा खुलासा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी AI चा वापर केला. एआयच्या मदतीने आम्हाला दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जलद आणि यशस्वी परिणाम मिळाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.Read More

ट्रेण्डिंग

दिवाळीत चांगली बातमी, कर्करोगाच्या उपचारासाठी वापरली जाणारी ३ महत्वाची औषधं

दिवाळीच्या तोंडावर सरकारने कॅन्सर रुग्णाला दिलासा दिला आहे. कॅन्सरवरील उपचारात वापरली जाणारी महत्वाची तीन औषधे सरकारने स्वस्त केली आहेत. या संदर्भात सरकारने आदेश देखील काढले आहेत. देशात जीवनावश्यक औषधांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण ( NPPA ) करत असते. आता एनपीपीएने कॅन्सरवर उपचारासाठी वापरली जाणारी ट्रॅस्टुजुमाब(Trastuzumab), ओसिमर्टिनिब (Osimertinib) आणि डुर्वालुमाब (Durvalumab) […]Read More

शिक्षण

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी २२ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ, विलंब शुल्क भरावे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.यावर्षी बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या […]Read More

महानगर

राज्यात २८८ मतदारसंघासाठी ७९९५ उमेदवारांचे अर्ज दाखल हे

मुंबई, दि. ३०(एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता काल २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध […]Read More

ट्रेण्डिंग

बेपत्ता श्रीनिवास वनगा यांचा ३६ तासांनी कुटुंबाशी संपर्क, पुन्हा अज्ञातस्थळी

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज होते. यानंतर ते बेपत्ता झाले होते. अखेर 36 तासांनंतर ते कुटुंबाशी संपर्कात आले आहेत. वनगा सोमवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले होते, त्यामुळे त्यांची गायब होण्याची बातमीने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली होती.व्यथित […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

आर आर आबांनी माझा केसाने गळाच कापला होता

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज तासगावात रोहित पाटलांवर हल्लाबोल करीत आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता असा आरोप केला. सांगली जिल्ह्यातील तासगावात माजी खासदार संजय पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी ते बोलत होते. तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघाची वाईट अवस्था […]Read More

देश विदेश

७० वर्षांवरील लोक होणार आयुष्मान योजनेचे लाभार्थी, दरवर्षी ५ लाखांपर्यंत

नवी दिल्ली, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनत्रयोदशी आणि 9व्या आयुर्वेददिनी 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा सुरू केली. याअंतर्गत देशातील 6 कोटी वृद्धांना लाभ मिळणार आहे.केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा (PM-JAY) विस्तार केला आहे आणि त्यात वृद्धांचा समावेश […]Read More

देश विदेश

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी

वॉशिंग्टन डीसी,दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, यात 600 हून अधिक भारतीय-अमेरिकन सहभागी झाले होते. भारतीय-अमेरिकन खासदार, अधिकारी आणि व्यावसायिक नेत्यांना संबोधित करताना, बायडेन म्हणाले की व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा सर्वात मोठा कार्यक्रम आयोजित करणे हा त्यांच्यासाठी सन्मान आहे.बायडेन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष, […]Read More