Month: October 2024

पश्चिम महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडने शिवसेने उबाठा सोबतची युती तोडली

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासोबत असणारी गेले दोन ते अडीच वर्षाची युती तोडणार असल्याची घोषणा आज पुण्यात संभाजी ब्रिगेड कडून करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला योग्य मान मिळाला नसल्याचा आरोप मनोज आखरे आणि संभाजी ब्रिगेडच्या […]Read More

पर्यटन

एक आकर्षक किल्ला, पुराण किला

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुराण किला उर्फ जुना किल्ला हा हुमायूनने सोळाव्या शतकात बांधलेला आणि शेरशाह सुरीने सुमारे दोन किलोमीटरच्या परिक्रमामध्ये बदललेला एक आकर्षक किल्ला आहे. हा त्याचा इतिहासाचा भाग आहे. आता, मजेशीर भागाकडे येत आहे, संध्याकाळी येथे नेत्रदीपक प्रकाश आणि ध्वनी शोला उपस्थित राहण्याचा एक मुद्दा बनवा. यात शौर्य, राजकारण आणि […]Read More

Lifestyle

साबुदाणा खिचडी: उपवासाची चवदार डिश

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साबुदाणा खिचडी हा भारतातील धार्मिक सण आणि उपवासाच्या काळात उपवासाचा एक स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थ आहे. टॅपिओका मोती (साबुदाणा), बटाटे, शेंगदाणे आणि मसाल्यांच्या चवीपासून बनवलेली ही डिश केवळ पौष्टिकच नाही तर आश्चर्यकारकपणे चवदार देखील आहे. ते हलके, पचायला सोपे आणि उपवासाच्या दिवसांत ऊर्जा पुरवते. आपल्या उपवासाच्या दिवसांसाठी योग्य […]Read More

पर्यावरण

बिबट्याची छेड काढणेपडले महागात, काय केले बघा

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात रविवारी, 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी जंगलाजवळ पिकनिकला गेलेल्या तीन जणांनी बिबट्याची छेड काढली. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने त्या तिघांवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. पीडितांपैकी एक महिला आणि एक ऑफ ड्यूटी पोलिस अधिकाऱ्यासह दोन जण गंभीर आहेत. ML/ML/PGB 23 Oct 2024Read More

देश विदेश

चौथी न्यूक्लियर मिसाईल सबमरीन लॉंच, भारताची संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारताने संशोधन क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. भारताने नुकतीच चौथी न्यूक्लियर-शस्त्रधारी बॅलेस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) लाँच केली आहे. विशाखापट्टणमच्या शिप बिल्डिंग सेंटरमध्ये या नवीन सबमरीनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे. यामुळे भारताच्या आण्विक प्रतिरोध क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातील आण्विक क्षेपणास्त्रांवरील हा प्रकल्प देशाच्या इतर महत्वाकांक्षी योजनांशी संबंधित […]Read More

विदर्भ

कोपर्शी चकमकीतील मृतांमध्ये दोन मोठ्या नक्षल कॅडरचा समावेश

गडचिरोली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ५ नक्षली ठार झाले. सर्वांची ओळख पटली असून, त्यात दोन मोठ्या कॅडरचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. मृत नक्षल्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. जया उर्फ भुरी पदा(३१) (छत्तीसगड) आणि […]Read More

राजकीय

नाईक , भुजबळ , राणे यांच्या मुलांनी हाती घेतला वेगळा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या मुलांनी आमदारकी लढविण्यासाठी आपल्या वडिलांच्या पक्षापेक्षा वेगळा झेंडा हाती घेत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे सत्तेच्या सोयीसाठी सर्वच राजकीय पक्षांनीही सर्व धरबंध सोडल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे . नवी मुंबई मधून माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघात […]Read More

महानगर

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. आज प्रदेश कार्यालयात विविध क्षेत्रातील आणि पक्षातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दीनानाथ सिंह, हिंद केसरी पैलवान अमोल बराटे, हिंद केसरी पैलवान […]Read More

राजकीय

२४ ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुक उमेदवारांची बैठक…

जालना, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसोबत मनोज जरांगे चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांनी राजकारणात उतरण्याची घोषणा केली असून ज्या मतदार संघात आपला उमेदवार निवडून […]Read More

महानगर

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणामध्ये तुरूंगात असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वाझेला कथित वसुली प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून वाझे तुरूंगात होते. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी […]Read More