Month: September 2024

ट्रेण्डिंग

कापूस , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२०२३ च्या खरीप हंगामातील कापूस तथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख […]Read More

देश विदेश

अमेरिकेने सिरीयावर केला एअरस्ट्राइक, ३७ दहशतवाद्यांचा खात्मा

अमेरिकेने सीरियातील ISIS आणि अल कायदाशी संबंधित दहशतवादी गटांच्या लक्ष्यांवर हल्ला केला. यामध्ये ३७ दहशतवादी मारले गेले आहेत. अमेरिकन सैन्याकडून दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये हल्ले करण्यात आले आहेत. यूएस सेंट्रल कमांडच्या म्हणण्यानुसार, १६ सप्टेंबर रोजी मध्य सीरियामध्ये ISIS च्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये २८ दहशतवादी मारले गेले.यानंतर २४ सप्टेंबरला अमेरिकन लष्कराने उत्तर-पश्चिम […]Read More

ट्रेण्डिंग

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून ओळखल्या जाणार, राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्र सरकारने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये महाराष्ट्रातील देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा प्रस्ताव मान्य करून यासंदर्भातला शासन आदेश काढण्यात आला आहे. शासन आदेशात यासंदर्भातली सविस्तर माहिती देण्यात आली आहे. देशी गायींचं पालनपोषण करण्यासाठी […]Read More

Uncategorized

अकोळनेर इथे सापडले दुर्मिळ जलचक्रव्युह शिल्प

अहमदनगर, दि.३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर येथे दुर्मिळ दगडी जलचक्रयूव्ह शिल्प शोधण्यात यश आले आहे, हे प्राचीन शिल्प साडेचार फूट व्यासाचे आणि अखंड पाषाणात कोरलेले आहे , महाराष्ट्रात प्रथमच असे दुर्मिळ शिल्प सापडले आहे. महाराष्ट्रातील गड, किल्ले संवर्धन आणि पुरातन वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची ही शोध मोहीम यशस्वी ठरली, […]Read More

गॅलरी

भर जंगलात वाघ आणि अस्वलाची थरारक झुंज

चंद्रपूर दि २९-( एमएमसी न्यूज नेटवर्क) :-वाघ आणि अस्वलाच्या झुंजीचा थरारक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हीडिओ चंद्रपूर जिल्ह्यातील खडसंगी बफर क्षेत्रातील सांगितला जात असून, छोटा मटका नावाचा हा वाघ अस्वलाशी भिडला. अस्वलाला छोटे पिल्लू असल्याने त्याच्या रक्षणासाठी मादी अस्वल चांगलीच आक्रमक झाली. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी या अस्वल मातेने थेट वाघालाच अंगावर घेतले. तिचे आक्रमक […]Read More

पर्यटन

आसाममधील एकमेव हिल स्टेशन, हाफलांग

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आसाममधील एकमेव हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेले हाफलांग हे निसर्ग आणि वन्यजीव प्रेमींसाठी आनंददायी ठिकाण आहे. पर्वत, हिरव्यागार दऱ्या, निसर्गरम्य लँडस्केप आणि अननस आणि संत्र्याच्या बागा या ठिकाणी खूप आकर्षण वाढवतात आणि ते प्रदूषित आणि गर्दीच्या शहरांपासून एक आदर्श मार्ग बनवतात. जर तुम्हाला साहसाची इच्छा असेल, तर हाफलांगमध्ये काही […]Read More

अर्थ

चीनच्या मध्यवर्ती बँकेच्या घोषणेनंतर भारतीय बाजाराने गाठले नवे शिखर

मुंबई, दि. 29 (जितेश सावंत) : २७ सप्टेंबर रोजी संपलेला आठवडा  हा बाजारासाठी सलग तिसरा तेजीचा आठवडा ठरला.  यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने धोरणात्मक व्याजदरात 0.50 टक्क्यांनी केलेली कपात व अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने व्यापक प्रोत्साहन उपायांची केलेली घोषणा या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराने नवे शिखर गाठले. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 85,978.25 आणि 26,277.35 या नवीन उच्चांकांना स्पर्श […]Read More

महानगर

अखेर बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायालयाच्या आदेशानंतरही जनतेच्या विरोधाला न जुमानता अक्षय शिंदेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीत आणल्यावर उल्हासनगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह स्मशानभूमीत दफन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अक्षय शिंदेची कबर खोदण्यावरून वाद निर्माण झाला आणि खोदलेला […]Read More

देश विदेश

अंतराळवीर सुनिता विल्यम्सना पृथ्वीवर आणण्यासाठी ‘फाल्कन ९’ रवाना

फ्लोरिडा, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ५ जूनपासून अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ड्रॅगन यानाद्वारे पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे.या ड्रॅगन यानाला नेण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने काल दुपारी फ्लोरिडा येथील केप कॅनवेरल लॉन्च पॅडवरून त्यांचे ‘फाल्कन ९’ रॉकेट अवकाशात पाठवले. ड्रॅगन अंतराळ […]Read More

महानगर

पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्गाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आलं. आजपासून ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. नागरिकांनी आवर्जून हा मेट्रो प्रवास करावा असे मेट्रो प्रशासनाने आवाहन केले आहे. या उद्घाटनाप्रसंगी […]Read More