Month: September 2024

देश विदेश

मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; केंद्राने पाठवले CRPF

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनाकडे मोर्चा काढला. विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत ५० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. पाच दिवसांपासून राज्यभरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ML/ML/PGB 11 sep 2024Read More

पश्चिम महाराष्ट्र

सोयाबीनचे बाजारातील दर गडगडले शेतकरी वर्गात चिंता

सांगली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन या शेतीमालाचे बाजारातील दर घसरले आहेत. सांगली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची चिंता त्यामुळे वाढली आहे. सोयाबीन तेलाच्या आयातीमुळे स्थानिक बाजारातील हे दर घसरले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी गेली काही दिवस दरवाढीची अपेक्षा करीत आहेत. सोयाबीन पिकासाठी 4,800 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. पण खरेदी केंद्र नसल्यामुळे माल […]Read More

पर्यटन

बडोदा-मुंबई महामार्गावरील बोगदा विना अपघात १५ महिन्यात पूर्ण

पनवेल, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बडोदा – मुंबई या महामार्गाच्या बांधकामाच्या शेवटच्या पॅकेजचे बदलापूर येथील भोज गाव ते पनवेल येथील मोरबे गाव येथील ९.९८ किलोमीटर लांबीचे बांधकाम वेगाने सुरू असून या महामार्गावर ४.१६ किलोमीटर लांबीचे दोन दुहेरी बोगदे खणले जात आहेत.यातील एक बोगदा खणण्याचे काम अवघ्या १५ महिन्यांत पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री […]Read More

करिअर

JSSC ने स्टेनोग्राफरच्या 454 पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीर

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झारखंड कर्मचारी निवड आयोगाने झारखंड सचिवालयात स्टेनोग्राफरच्या ४५४ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार jssc.nic.in या संकेतस्थळावर 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पदवी. वयोमर्यादा: 21 ते 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एससी, एसटी, […]Read More

महिला

बाबाजी दाते महिला बँक घोटाळ्यातील २०६ आरोपींना अद्याप अटक नाही

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतून 206 जणांना गुंतवून 242 रुपयांचा गंडा घातल्याचे एका विशेष लेखापरीक्षणात उघड झाले. या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे, परंतु त्यांनी नुकतेच काम सुरू केले आहे. आतापर्यंत, या घोटाळ्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे […]Read More

पर्यावरण

३० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :यंदा दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी पर्यावरणाचे संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पहाटे ३ पर्यंत दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन जल्लोषात झाले. सार्वजनिक आणि घरगुती मिळून तब्बल ६६ हजार ३३९ गणेशमूर्ती विसर्जित केल्या. यामधील जवळपास ३० हजारांहून अधिक ४५ टक्के लोकांनी कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली. मुंबई […]Read More

Featured

नवीन फीचर्ससह iPhone १६ ची जबरदस्त एंट्री!

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Apple ने आपला बहुप्रतिक्षित iPhone 16 सिरीज लाँच केली असून, यामध्ये विविध रंगांच्या आकर्षक व्हेरियंट्स उपलब्ध आहेत. हा नवा आयफोन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जबरदस्त कॅमेरा फीचर्ससह येत आहे. यामध्ये प्रगत चिपसेटचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे फोनची कार्यक्षमता अधिक वेगवान झाली आहे. नवीन iPhone 16 मध्ये सुधारित बॅटरी […]Read More

महानगर

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; चालक अटकेत!

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Description: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी गाडीने रविवारी (8 सप्टेंबर) मध्यरात्री नागपूर शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. अपघातात अनेक वाहने धडकली गेली असून, या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त गाडीतील चालकाला अटक केली […]Read More

गॅलरी

पुणे ते हुबळी दरम्यान धावणार वंदे भारत एक्स्प्रेस

सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हुबळी – सांगली- पुणे या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर वंदेभारत रेलसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील प्रवासी वर्गाची सोय यामुळे होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण ही कामे पूर्ण झाली […]Read More

ट्रेण्डिंग

राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

कोल्हापूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात आले असून ४ हजार ३५६ क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु केला आहे. यामुळे 2३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जोरदार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राधानगरी, शाहूवाडीत जोरदार पाऊस असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे.यात कापणीला आलेल्या भातपिकाचं चांगलंच नुकसान झाले आहे. […]Read More