Month: September 2024

पर्यावरण

वडाच्या झाडावर विसावले गणपती बाप्पा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुंडेवाडी येथील जय हनुमान गणेशोत्सव मंडळाने वडाच्या झाडावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. वृक्षतोड थांबवून पर्यावरणाच्या संवर्धनाची संस्कृती ग्रामस्थांत रुजावी यासाठी गेल्या १५ वर्षांपासून मंडळ हा उपक्रम राबवत आहे.डीजेमुक्त गणेशोत्सव, एक गाव, एक गणपती उपक्रम, झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश मंडळ देत आहे. हा वेगळा उपक्रम पंचक्रोशीच्या आकर्षणाचा […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार देशातील पहिल्या ‘वंदे भारत मेट्रो’चे उद्घाटन

मुंबई, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. ही वंदे भारत मेट्रो गुजरातमधील भुज ते अहमदाबाद असा प्रवास करणार आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेन 9 स्थानकांवर सरासरी 2 मिनिटे थांबून 5 तास 45 मिनिटांत प्रवास पूर्ण करेल. ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस चालणार […]Read More

अर्थ

RBI कडून या दोन मोठ्या खाजगी बँकांवर दंडात्मक कारवाई

मुंबई, दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला वैधानिक आणि नियामक अनुपालनातील काही त्रुटींबद्दल एकूण 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने असेही म्हटले आहे की हे दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील कमतरतांशी संबंधित आहेत आणि बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर परिणाम […]Read More

विज्ञान

एलॉन मस्क यांची अंतराळ मोहीम यशस्वी

मुंबई, दि. 15(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांची महत्वाकांक्षी अंतराळ मोहीम यशस्वी झाली आहे.मस्क यांच्या कंपनीच्या फाल्कन-9 रॉकेटमधून 10 सप्टेंबर रोजी पोलारिस डॉन मिशनचे प्रक्षेपण करण्यात आले. या 5 दिवसांच्या मोहिमेत, 4 अंतराळवीर कक्षेत गेले (1,408.1 किमी), ज्यामध्ये 50 वर्षांहून अधिक काळ एकही अंतराळवीर गेला नव्हता.पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना अंतराळयानाचा वेग ताशी […]Read More

मनोरंजन

मराठवाड्यातील दाहक वास्तव मांडणाऱ्या ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँच

मुंबई, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील पाणी प्रश्न मांडणारा एक विशेष चित्रपट अभिनेता‌ आदिनाथ कोठारे याने दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत आज ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँच केला.मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट […]Read More

राजकीय

केजरीवाल दोन दिवसांत देणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

नवी दिल्ली, दि. 15. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी नुकतेच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. आपण राजीनामा दिल्यानंतर दिल्लीच्या निवडणुकादेखील महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबर घेण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून […]Read More

ट्रेण्डिंग

राष्ट्रीय अभियांत्रिकी दिवस: नवनवीन रचना आणि पुनर्रचना करणारा किमयागार

-राधिका अघोर भारतातील सर्वोत्कृष्ट अभियंत्यांपैकी एक मानले जाणारे, भारतीय अभियांत्रिकीचे जनक, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणजेच आज 15 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश काळात 1861 साली जन्मलेल्या सर विश्वेश्वरय्या यांनी, पुण्याच्या सायन्स कॉलेज मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. त्यानंतर, त्यांनी 1912 साली, म्हैसूरच्या संस्थानाचे दिवाण म्हणून आपल्या कारकिर्दीची […]Read More

महानगर

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास १७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. १४ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती […]Read More

विज्ञान

अंतराळवीर सुनीता विल्यम्स स्पेस स्टेशनवरून करणार USA च्या निवडणुकीत मतदान

वॉशिग्टन डीसी, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभऱ दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुच विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) पत्रकार परिषद घेतली. शुक्रवारी भारतीय वेळेनुसार रात्री 12.15 वाजता सुरू झालेल्या या परिषदेत सुनीता आणि बुच यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. अमेरिकेच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार असल्याचे दोघांनी […]Read More

महानगर

मुंबई आणि परीसरामध्‍ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री सुरु

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात कांद्याची किरकोळ विक्रीसाठीच्या फिरत्‍या वाहनाला हिरवा झेंडा दाखवत 35 रूपये प्रतिकिलो या दराने कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्‍यात आली आहे. कांद्याची किरकोळ विक्रीची सुविधा एनसीसीएफ आणि नाफेड च्या विक्री केंद्रावर आणि . मोबाईल व्हॅनद्वारे प्रमुख उपभोग केंद्रांमध्ये, म्हणजे, दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्री सुरू झाली आणि […]Read More