Month: September 2024

ट्रेण्डिंग

मुस्लीम आणि महाराष्ट्रीयन लोकांना मी व्यवसाय देत नाही म्हणणाऱ्या टीसीचे

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम रेल्वेचे तिकीट कलेक्टर (TC) आशिष पांडे यांनी महाराष्ट्रातील लोक आणि मुस्लीम समाजाविरुद्ध भेदभाव करणारे वक्तव्य केल्याने मुंबईत मोठा वाद निर्माण झाला आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील परंतु मुंबईतील विक्रोळी येथे राहणारे पांडे यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते ‘मराठी किंवा मुस्लीम व्यवसायिकांकडून खरेदी करणार नाही तसेच […]Read More

राजकीय

सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याचवेळी राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी […]Read More

राजकीय

राहुल गांधी यांचा पितृदोष

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून पितृ पंधरवड्यात घरोघरी तर्पण, पितरे जेवायला घालणे यासारखे विधी पार पाडले जातात. पितरांना शांती मिळाली नाही, पितृदोष असेल तर प्रगति खुंटते, अनंत समस्या उभ्या राहतात अशी धारणा आहे. पितृदोषाने ग्रस्त लोक विविध तोडगे शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. कोंग्रेस पक्षाचे […]Read More

ट्रेण्डिंग

आंतरराष्ट्रीय सांकेतिक चिन्ह भाषा दिन : साईन अप फॉर साईन

राधिका अघोर साईन लँग्वेज म्हणजे चिन्हांची सांकेतिक भाषा.ज्यांना निसर्गानं श्रवण म्हणजेच ऐकण्याची आणि (अनेकदा बहिरेपणामुळे )बोलण्याची शक्ती दिलेली नाही, अशा मूक बधीर लोकांसाठी सांकेतिक भाषा विकसित करण्यात आली. यालाच इंग्रजीत sign language असे म्हणतात. जगभरात सुमारे 70 दशलक्ष मूक बधिर लोक आहेत असं एक आकडेवारी सांगते. कान निकामी झाल्यामुळे, किंवा इतर कारणांमुळे बालपणापासून शब्द ऐकूच […]Read More

पर्यटन

मिझोराम राज्याची राजधानी, आयझॉल

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिझोराम राज्याची राजधानी, आयझॉल हे भारताच्या ईशान्य भागातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. आयझॉल हे काही भव्य नैसर्गिक आकर्षणांचे घर आहे, ज्यात डर्टलांग टेकड्या, वांटॉंग फॉल्स आणि राज्यातील सर्वात जास्त लोकप्रिय फावंगपुई शिखर यांचा समावेश आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी, अभ्यागतांना इनर लाईन परमिट (ILP) मिळणे आवश्यक आहे, जे […]Read More

Uncategorized

फेडच्या व्याजदर कपातीच्या घोषणनेनंतर बाजाराची गगनभरारी

जितेश सावंत मागील आठवडा भारतीय बाजारासाठी संस्मरणीय ठरला. यूएस फेडरल रिझर्व्हने चार वर्षांहून अधिक काळातील पहिल्या व्याजदर कपातीची घोषणा केल्यानंतर, भारतीय शेअर बाजाराने जागतिक ट्रेंडशी ताळमेळ साधत नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय बाजाराने तूफान तेजी अनुभवली. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 84,694.46 आणि 25,849.25 हे नवे उच्चांक गाठले. आठवड्यात दोन्ही बेंचमार्क प्रत्येकी 2 […]Read More

महानगर

ओबीसी – मराठा दंगल घडवून आणण्यात शरद पवार अपयशी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ओबीसी आणि मराठा यांच्यात यशस्वीपणे दंगल घडवून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अपयशी ठरले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने जातीय फूट पाडून मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा निर्धार केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ॲड. […]Read More

देश विदेश

चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची सुवर्णपदकासह ऐतिहासिक कामगिरी

भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने आता ४५व्या ऑलिम्पियाडमध्ये चमकदार कामगिरी करत संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे. गुकेशने चेस ऑलिम्पियाडमधील ८ सामने जिंकले तर २ ड्रॉ सामने खेळले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने चमकदार कामगिरी करत बुद्धिबळ संघाला कायमच […]Read More

ट्रेण्डिंग

हा पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यास राज ठाकरेचा सक्त विरोध

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाला महाराष्ट्रात प्रवेश देणं महागात पडेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. फवाद खानचा हा चित्रपट भारतात लवकरच प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट प्रदर्शित होईल त्याच सुमारास नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात कोणताही संघर्ष होऊ नये, अशी […]Read More

देश विदेश

आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमध्ये भारतीय फायटरने पाकच्या फायटरचा केला पराभव

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय मिक्सड आर्शल आर्ट (MMA) संग्राम सिंहने पाकिस्तानी फायटरला धोबीपछाड देत नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय फायटींग चॅम्पियनशीपमधील 93 किलो वजनी गटात संग्राम सिंहने शानदार विजय मिळवला. जॉर्जिया येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये संग्रामने पाकिस्तानचा फायटर अली रजा नसीर याचा पराभव करत तिरंगा उंचावला. संग्रामने अवघ्या 1 […]Read More