Month: August 2024

महिला

मेजर सीता शेळके : वायनाड बचाव कार्यातील ‘वाघीण’

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके. वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात […]Read More

पर्यावरण

कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव करण्यासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा २०२४ चा दुसरे जागतिक कृषी आणि धोरण पुरस्कार नुकताच महाराष्ट्राला जाहीर करण्यात आला. मुंबई युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने या […]Read More

महिला

पारनेरच्या लेकीची वायनाडमधील बचावकार्यात अभिमानास्पद कामगिरी

अहमदनगर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : वायनाड (केरळ) जिल्ह्यातील चार गावात विनाशकारी भूस्खलनामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत भारतीय लष्कराच्या मदतीने बचाव कार्य वेगाने सुरू आहे. निघोज (ता.पारनेर) येथील स्वामी समर्थ बँकेचे अध्यक्ष अशोक शेळके यांची कन्या मेजर सीता शेळके यांनी या बचावकार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मेजर सीता शेळके यांनी भारतीय सैन्याच्या इंजिनिअर्स रेजिमेंटच्या टीमसोबत […]Read More

राजकीय

वरळी पोलीस वसाहत, बीडीडी चाळ आणि एस आर ए रहिवाशांच्या

मुंबई, दि, ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पोलीस दिवसरात्र आपले रक्षण करतात पण मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत. आपल्याला पोलिसांसाठी लवचिक भूमिका ठेवावी लागेल, म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, नगरविकास विभाग यांनी एकत्रितपणे आपल्याला कशा पद्धतीने मुंबई आणि परिसरात पोलिसांसाठी सेवा सदनिका उपलब्ध करून देता येतील ते प्राधान्याने आणि कालबद्ध पद्धतीने ठरवावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]Read More

पर्यावरण

कोल्हापुरात पावसानं पुन्हा जोर पकडला, धरणक्षेत्रात धुवाँधार

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून धरण परिसरात धुवाधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू आहे यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. पुराचं पाणी हळूहळूवाढू लागलं आहे. दूधगंगा नदी पात्र सलग नवव्या दिवशी धोका पातळी बाहेर वाहत आहे. हातकणंगले, शाहूवाडी, कागल आणिभुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी […]Read More

गॅलरी

राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

नवी दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. २) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. ML/ML/PGB 3 Aug 2024Read More

ट्रेण्डिंग

देशात पन्नास हजार कोटी खर्चून आठ नवे राष्ट्रीय अतीद्रुतगती महामार्ग

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात रस्ते आणि महामार्गांचे जलद नेटवर्क उभारणे या विषयाला केंद्रातील भाजप सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने 936 किमी लांबीच्या 8 महत्त्वाच्या राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या 8 प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे अंदाजे 4.42 कोटी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष […]Read More

महिला

पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकर इतिहास रचण्याच्या तयारीत

पॅरिस, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑलिम्पिक २०२४ चा आज सातवा दिवस असून भारतीय खेळाडूंनी पात्रता फेरी गाठत पदक जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत भारताने तीन कांस्यपदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत मिळाली आहेत. आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये खेळताना दिसणार आहत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी […]Read More

राजकीय

नामांतर प्रकरणी हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची भूमिका घेतली आहे.या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्याला दिलेला आहे. याशिवाय नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात अशी परिस्थिती असते, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. नाव […]Read More

महानगर

विरारमध्ये Hit and Run मुळे प्राध्यापिकेचा मृत्यू

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही महिन्यांपासून Hit and Run च्या प्रकारामुळे सर्वसामान्यांना किडेमुग्यांसारखे चिरडल्याच्या संतापजनक बातम्या राज्यभरातून समोर येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बड्या व्यक्तींच्या मुलांचाच हात असल्याचे समोर आले आहेत. विरारमध्ये हिट अँड रन घटनेत गुरुवारी झालेल्या अपघातात एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाला आहे. आत्मजा राजेश कासट (वय ४६) असे या प्राध्यापिकेच […]Read More