वाशिम, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ ३२.६६ टक्के एवढाच पाणीसाठा असून पावसाळा अर्धा होऊन गेला तरीही प्रकल्पातील पाणी पातळी न वाढल्यानं वाशिम शहरवासीयांची चिंता वाढली आहे. सध्या शहराला नगरपरिषदेकडून दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान जिल्ह्यातील इतर दोन मध्यम प्रकल्पाची स्थिती मात्र उत्तम आहे. त्यामध्ये सोनल प्रकल्प […]Read More
सांगली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी आज दुपार पर्यंत स्थिर होती, सांगलीतील आरवाडे प्लॉट, सूर्यवंशी प्लॉट, कर्नाळ रोड वरील घरात अजून ही पुराचं पाणी आहे. सांगलीतील सूर्यवंशी प्लॉट येथीलपूरग्रस्त नागरिकांनसाठी भारतीय सैन्य दलाकडून मदत कार्य सुरु केले आहे. आज बोटीतून जाऊन भारतीय सैन्य […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. यामाध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून महामंडळाने प्रवाशांनी या उपक्रमात जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे. श्रावण […]Read More
चंद्रपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरून काडतुसांचा मोठा साठा सापडला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरी पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली आहे. घरी 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे सापडल्यामुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. यासाठी शहरातील इंदिरानगर भागातील सहारे याच्या […]Read More
नवी दिल्ली, दि.03(एमएमसी न्यूज नेटवर्क).: केंद्र सरकारनं सीमा सुरक्षा दलाच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना पदावरुन हटवलं आहे. बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष महासंचालक वाय. बी. खुरानिया यांची गृह मंत्रालयाकडून उचलबांगडी करण्यात आली आहे. याबद्दलचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीनं त्यांच्या गृह राज्यांमध्ये पाठवण्यात आलं आहे. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे […]Read More
पॅरिस, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पॅरिस ऑलिम्पिकच्या 8व्या दिवशी भारताला तिरंदाजी आणि नेमबाजीत 2 पदकांची अपेक्षा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. महिला नेमबाजीत शनिवारी महिलांच्या 25 मीटर पिस्तुलची अंतिम फेरी पार पडली.भारतीय नेमबाज मनू भाकरचे तिसरे पदक हुकले. अंतिम फेरीत ती चौथ्या स्थानावर राहिली. कांस्यपदक जिंकणाऱ्या हंगेरीच्या मेजर वेरोनिकाकडून मनूला शूटऑफमध्ये पराभव […]Read More
मुंबई, दि.३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी भारताने आपल्या प्रमुख अंतराळवीराची निवड केली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे प्रमुख अंतराळवीर असतील. कॅप्टन प्रशांत नायर यांचीही या मोहिमेसाठी निवड करण्यात आल्याचे इस्रोने काल जाहीर केले. बॅकअप म्हणून तो त्याचा भाग असेल. शुभांशु इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) कधी जाणार याची तारीख […]Read More
नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी टेलेकॉम कंपन्यांच्या रिचार्ज दरात मोठी वाढ होत असल्याने लोकांना आता सरकारी कंपन्यांची गरज भासू लागली आहे. BSNL 5G ची वाट अनेकजण पाहत आहेत आणि लवकरच सरकारी कंपनी नेक्स्ट जेन नेटवर्क सर्व्हिस लाँच करू शकते. कारण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे BSNL 5G चं टेस्टिंग करताना दिसले आहेत. […]Read More
बीजिंग,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): चीनमध्ये जन्मदर आणि विवाहदर कमालीचा कमी झाला आहे. यामुळे चीन सरकार चिंतेत आहे. आता चीनच्या ‘सिव्हिल अफेअर्स’ अर्थात नागरी व्यवहार विद्यापीठाने विवाह-संबंधित उद्योग आणि संस्कृती विकसित करण्यासाठी नवीन पदवीपूर्व ‘विवाह ‘ या विषयावर अभ्यासक्रम तयार केला आहे.पुढील महिन्यात सप्टेंबरपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. बीजिंग येथील ‘सिव्हिल अफेअर्स’ विद्यापीठात सप्टेंबरमध्ये […]Read More
अलिबाग दि ३ केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसानंतर तसेच झालेल्या विध्वंसानंतर तिथे पर्यटन आणि देवदर्शनासाठी गेलेल्या नागरिकांना प्रचंड हाल अपेष्टाना सामोरं जावं लागत आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग पर्यंतचा रस्ता उद्ध्वस्त झाल्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले आहेत. तिथल्या सरकार कडून कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत,अशी त्याठिकाणी अडकलेल्या नागरिकांची तक्रार असून बदलत्या वातावरणामुळे ते घाबरून गेले आहेत. […]Read More