Month: August 2024

राजकीय

राज्यातील महिला अधिकाऱ्यांचे प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून कौतुक

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला विकास आणि नारी सशक्तीकरणात महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचं काम करत असल्याचं सांगून राज्यातल्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुककेलं. पालघर येथे आयोजित वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात प्रधानमंत्री मोदी यांनी राज्यातल्या महिला सशक्तीकरण आणि महिला अधिकाऱ्यांचं जाहीर सभेत […]Read More

देश विदेश

सोशल मीडिया राष्ट्रविरोधी पोस्ट टाकल्यास उत्तर प्रदेश सरकार देणार जन्मठेपेची

लखनौ, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मिडियावर प्रक्षोभक पोस्टस टाकून त्यावर उलटसुलट प्रतिक्रीया आणि चर्चा घडण्याचे प्रकार सध्या बोकाळले आहेत. उत्तर प्रदेश सरकार आता अशा प्रकारांवर काटेकोरपणे लक्ष देऊन कठोर शिक्षा करणार आहे. सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावर नियंत्रण आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कडक सोशल मीडिया धोरण तयार केले आहे. नव्या धोरणानुसार राष्ट्रविरोधी […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्य शासनाने रद्द केली मुस्लिम आमदारांना नमाज पठणासाठी मिळणारी

दिसपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज (३० ऑगस्ट) राज्यातील मुस्लिम आमदारांना दर शुक्रवारी मिळणाऱ्या दोन तासांच्या नमाज अदा करण्यासंदर्भातील सुट्टीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आता मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी देण्यात येणारी दोन तासांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, यापुढे ही दोन […]Read More

बिझनेस

Vistara Airline चे टाटा कंपनीमध्ये होणार विलिनीकरण

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंगापूर एअरलाइन्सला विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (FDI) भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. सिंगापूर एअरलाइन्स टाटा समूहासोबत संयुक्तपणे विस्तारा चालवते. या मान्यतेमुळे या वर्षाच्या अखेरीस विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के […]Read More

गॅलरी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब […]Read More

ट्रेण्डिंग

यंदाही काश्मिर खोऱ्यात ३ ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार

गणपती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या धुमधड्याक्यात साजरा केला जातो. गेल्या वर्षीपासून तो काश्मीर खोऱ्यातही साजरा व्हायला लागला आहे. यंदाही सलग दुसऱ्या वर्षी काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून या मंडळांना येत्या शनिवारी (दि. ३१) पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती सुपूर्द करण्यात येणार आहेत. ‘श्रीमंत […]Read More

ट्रेण्डिंग

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत अवनी लेखराने भारताला दिलं पहिलं गोल्ड मेडल

पॅरिस, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धा सध्या सुरू आहे. शुक्रवारी (30 ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या दुसऱ्या दिवशी भारताने एकाच स्पर्धेत […]Read More

राजकीय

वाढवण बंदर भूमिपूजन प्रसंगी मोदींनी मागितली शिवरायांची माफी

पालघर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ४० फूट पूर्णाकृती पुतळा सोमवारी (दि.२६) कोसळला त्यानंतर राज्याभरातील शिवप्रेमींमध्ये दु:ख, संताप आणि उद्रेकाची लाट निर्माण झाली तर सत्ताधारी आणि राजकारण्यांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. या दुर्दैवी घटनेबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागीतली आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे […]Read More

महानगर

मोदींच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांना अटक

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, मोदी माफी मागो… असा नारा देत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बीकेसीचं जियो कन्व्हेन्शन सेंटर दणाणून सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम याच ठिकाणी होता. पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना अटक करून खेडवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग मध्ये […]Read More

महानगर

एससी एसटी क्रिमीलेयर, उपवर्गीकरणावर पुनर्विचार याचिका दाखल करणार

अकोला, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अनुसूचित जाती (SC)मध्ये क्रिमी लेयर आणि उप-वर्गीकरणाला परवानगी देणाऱ्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रतीक बोंबार्डे यांच्यामार्फत आज पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. ॲड. आंबेडकर म्हणाले की, यावेळी पुनर्विचार याचिकेतील मुद्द्यांवर […]Read More