Month: July 2024

ट्रेण्डिंग

ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांचा दारूण पराभव, मजूर पक्ष आघाडीवर

नुकत्याच ब्रिटनमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. मजूर पक्ष आघाडीवर आहे. ४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटीव्ह पक्षाला ब्रिटिशांनी सत्तेबाहेर फेकले आहे. तर लेबर पार्टीला ४०० पार नेऊन ठेवले आहे.. ब्रिटनमध्ये एक्झिट पोल खरे ठरले असून सुनक यांचा पक्ष आतापर्यंत १११ जागाच जिंकू शकला आहे.Read More

ट्रेण्डिंग

गोकुळच्या दुधाचे दर वाढले

गोकुळच्या दुधाचे दर सध्या वाढले आहेत. त्यानुसार गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ करण्याचा निर्णय दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ फक्त मुंबई, पुण्यासाठी असणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल, अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा […]Read More

महानगर

महिलांना सशक्त करणारा आणि शेतकऱ्यांना बळ देणारा अर्थसंकल्प

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याची आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. महिलांना सशक्त करणारा आणि शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडायला मिळाला याचा सार्थ अभिमान आहे असं अजित पवार यांनी आज आपल्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना स्पष्ट केलं. महसुली जमा करोना नंतर सातत्याने वाढत आहे, मागील वर्षाच्या तुलनेत अकरा […]Read More

ट्रेण्डिंग

रोहित शर्माच्या घरात तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी ‘ग्रँड सॅल्युट’ देऊन

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :रोहित शर्माच्या घरात तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी ‘ग्रँड सॅल्युट’ देऊन त्याचे जोरदार स्वागत केले. हा खास क्षण त्यांनी एकत्र साजरा केला. या प्रसंगी सर्व मित्रांनी खास टी-शर्ट घालून त्यांच्या मैत्रीची ओळख पटवली. रोहितच्या घरात हा सण साजरा करताना सर्वांचे उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देत […]Read More

गॅलरी

विधानपरिषदेतील निवृत्त सदस्यांना निरोप

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेतील १५ सदस्यांच्या निवृत्तीनिमित्त विधान परिषदेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच पुनरागमन झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले. विधानपरिषदेतील १५ सन्मानीय सदस्यांचा कालावधी समाप्त होणार आहे. ज्यामध्ये विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल […]Read More

अर्थ

जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी GPF वरील व्याजदर जाहीर

नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वित्त मंत्रालयाने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निधी (GPF) आणि इतर तत्सम भविष्य निधी योजनांसाठी जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी ७.१ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. वित्त मंत्रालयाच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि इतर संबंधित योजना धारकांना फायदा होणार आहे. व्याजदरात केलेल्या या बदलामुळे त्यांच्या बचत आणि गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम […]Read More

महानगर

मुंबईत वृद्ध व्यक्तीची सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वृद्ध व्यक्तींच्या भोळेपणाचा फायदा उचलून त्यांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करण्याचे प्रकार हल्ली सर्रास पहायला मिळतात. मुंबईतील एका ७६ वर्षाच्या व्यक्तीला धाक दाखवून तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची […]Read More

राजकीय

मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिरवा कंदिल दिला होता. कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्प हा बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या धर्तीवर राबवण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार कामाठीपुराच्या मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे.दक्षिण मुंबईतील २७.५९ एकरावर असलेल्या […]Read More

देश विदेश

रत्नागिरीत होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, […]Read More

देश विदेश

जपानने आणल्या होलोग्राम असलेल्या चलनी नोटा

टोकीयो, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वक्षेत्रांत अत्याधुनिकतेचा ध्यास घेतलेल्या जपानने आता चलनी नोटांच्या छपाईतही अनोख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. जपानने होलोग्राम असलेल्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. वीस वर्षांनंतर या नोटा बाजारात आणल्या असून अशी वैशिष्ट्यपूर्ण छपाई जगात पहिल्यांदाच केली गेली आहे. या नोटावर थ्रीडी छायाचित्र छापण्यात येणार असून ज्या दिशेला नोट धरली […]Read More