Month: July 2024

महानगर

मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात जनजीवन ठप्प झाले आहे. रेल्वे सेवा, बस वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. कार्यालयांना जाणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मुंबई सेंट्रल येथे प्रवाशांची गर्दी […]Read More

महानगर

SRA योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यक

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): SRA अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून मिळालेले घर विकताना त्यासाठी एनओसी आवश्यकच आहे. एनओसीची अट ही न्यायालयाने घालून दिलेली आहे. त्यामुळे ती शिथिल करता येणार नाही, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाई गिरकर यांनी १९९५ मध्ये सुरू झालेल्या एसआरए योजनेला ३० वर्षे […]Read More

विदर्भ

काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान शहीद

श्रीनगर, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले .दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला […]Read More

मनोरंजन

धर्मवीर -२ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे येथील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. प्रेक्षकांच्या या प्रतिसादानंतर ९ ऑगस्ट रोजी धर्मवीर-२ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच होती. नुकताच धर्मवीर-२चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात […]Read More

देश विदेश

पाकिटबंद खाद्यपदार्थांवर आता दिसेल साखर आणि फॅट्सचं प्रमाण

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिटबंद खाद्यपदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यविषयक विविध तक्रारी जाणवत असल्याच्या अनेक घटना जगभरात समोर येत आहेत. जगभरातील आहारतज्ज्ञ अतिरिक्त वजनवाढ आणि लाईफस्टाईल संबंधित रक्तदाब. मधुमेह अशा आजारांसाठी पाकीटबंद पदार्थ जबाबदार असल्याचे निदर्शनास आणून देत आहेत. मात्र हे पदार्थ साखर ,मैदा, तेल, तूप यांनी युक्त असे हे पाकीटबंद पदार्थ चटकदार असल्याने […]Read More

पर्यावरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफानी पाऊस,पूरसदृश्य परिस्थिती, सतर्कतेच्या सूचना

सिंधुदुर्ग, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे . मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पिठ्ढवळ नदीला ओरोस येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नदीचे पाणी ओरोस ख्रिश्चनवाडीमधील काही घरात घुसले. पुरात फसलेल्या नागरिकाना स्थानिक बचाव पथकाने बोटींद्वारे सूखरुप बाहेर काढले. जिल्ह्यात अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली […]Read More

राजकीय

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज […]Read More

करिअर

ONGC मध्ये अधिकारी पदांसाठी भरती

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ONGC वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती एक वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता: निवड प्रक्रिया: पगार: याप्रमाणे अर्ज करा: अर्ज पाठवण्याचा पत्ता: पृष्ठभाग व्यवस्थापक कार्यालय, पहिला […]Read More

पर्यटन

दक्षिण भारतातील चेरापुंजी, अगुंबेला

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्नाटकात स्थित, अगुंबेला ‘दक्षिण भारतातील चेरापुंजी’ म्हणून संबोधले जाते आणि जुलै हा महिना आहे जेव्हा येथे ट्रेकिंगचा हंगाम सुरू होतो. पावसाळ्यात या ठिकाणाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते जेव्हा येथील हिरव्यागार दऱ्या आणि निसर्गरम्य पर्वत मध्यभागी येतात. अगुम्बेमध्ये या हंगामात ट्रेक करणे हा एक आव्हानात्मक पण एड्रेनालाईन-पंपिंग अनुभव असू […]Read More

महिला

महिला टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्य सरकार महिलांसाठी नवनवीन योजना आणत आहे. राज्यभरात लेक लाडकी, मुख्यमंत्री लाडकी बहीण, बस प्रवासात 50% सवलत, शैक्षणिक सुविधा, आर्थिक महामंडळ सखी, बचत गट, महिला सक्षमीकरण या योजना दिल्यावर आता मुंबई विमानतळावर महिला खाजगी टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला टॅक्सी चालकांसाना तासनतास ग्राहकांची […]Read More