Month: July 2024

ट्रेण्डिंग

केरळमध्ये ‘माळीण’सारखी दुर्घटना, वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. तर 100 हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. बचाव कार्यात […]Read More

ट्रेण्डिंग

हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेसचे 18 डबे रुळावरून घसरल्याने 2 ठार, 20 जखमी

झारखंडमधील बडाबांबूजवळ मंगळवारी मुंबई-हावडा मेलचे १८ डबे रुळावरून घसरल्याने दोघे ठार आणि २० जण जखमी झाले. झारखंडच्या चक्रधरपूर विभागातील राजखरस्वान वेस्ट आऊटर आणि बारांबू दरम्यान चक्रधरपूरजवळ हावरा-सीएसएमटी एक्सप्रेस रुळावरून घसरली. मुंबई हावडा मेलच्या B4 डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. B4 डब्यात आणखी एक प्रवासी अडकल्याची माहिती आहे आणि त्याला वाचवण्याचे काम सुरू […]Read More

महानगर

उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या

अलिबाग, दि ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांना अखेर मोठे यश मिळाले आहे. यशश्रीच्या हत्येचा आरोप असलेला दाऊद शेख हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. त्याचा मोबाइलही बंद होता. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरही पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर दाऊद शेखच्या पोलिसांनी राज्याबाहेर जाऊन […]Read More

क्रीडा

मनू भाकरच्या यशाचे नवे शिखर! ऑलिंपिक स्पर्धेत दोन पदके जिंकत

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग या भारतीय जोडीने भारताला दुसरं पदक मिळवून दिलं आहे. मनू आणि सरबज्योत यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी कोरियन जोडीचा पराभव केला. यापूर्वी रविवारी, मनू भाकेर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला […]Read More

राजकीय

मावळत्या राज्यपालांना निरोप

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर,यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव […]Read More

महिला

यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात दाऊद शेखला अटक!

यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठं यश मिळवले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. यशश्रीच्या हत्येनंतर समाजात खळबळ माजली होती आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. पोलिसांच्या सखोल तपासानंतर दाऊद शेखला पकडण्यात आले. या अटकेमुळे यशश्रीच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी आशा आहे.Read More

महानगर

आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कल्याणकारी महामंडळ

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात झिका विषाणूबाधितांची संख्या ४५ वर, दोघांचा मृत्यू

पुणे, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड पाऊस आणि पूरामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता झिका विषाणूचा मोठा धोका उत्पन्न झाला आहे. पुण्यात झिका विषाणूची लागण झालेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. काल पुण्यात झिकाचे आठ रुग्ण (Pune zika death) आढळून आले आहेत. त्यामुळे आता […]Read More

देश विदेश

Paris Olympic – बॅडमिंटनपटू लक्ष सेन सामना जिंकूनही विजयापासून वंचित

पॅरिस,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेमबाज मनू भाकरेने कांस्य पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे पदांचे खाते उघडले आहे. त्यानंतर आता अन्य खेळांडूंच्या कामगिरीकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे. यातच आपला बॅडमिंडनपटू लक्ष सेन याने सामना जिंकूनही त्याला विजयी घोषित करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात विजयाने केली. […]Read More

महानगर

लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नसल्याचे उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही. वीज जोडणीच्या आधारे बांधकाम अधिकृत असल्याचा दावा कुणी करू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. तसेच उच्च न्यायालयाने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळील दुकानदाराला दिलासा देण्यास नकार दिला. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराजवळ पूजेच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानदाराने पालिकेच्या कारवाईपासून संरक्षण मागत उच्च […]Read More