Month: July 2024

महिला

महिला आयआरएस अधिकाऱ्याने लिंग बदलले, नवीन नाव मिळाले

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हैदराबादमधील सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणच्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून सेवेत असलेल्या एम अनुसूया यांनी लिंग आणि नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकाथिर सूर्या ठेवले आहे. त्यांनी लिंग लिहिण्याच्या कॉलममध्ये स्त्रीच्या जागी पुरुष लिहिण्याची विनंतीही केली. भारतीय महसूल सेवेच्या […]Read More

महानगर

धारावी पुनर्विकासाबाबत सरकार काढणार श्वेतपत्रिका

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नाबाबत अनेकदा चर्चा होतात. अदानी समुह धारावीचा पुनर्विकास करणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. मात्र याबाबत ठेस निर्णय होताना दिसत नाही, याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना धारावी पुनर्विकास प्रकल्पात कुठलाही घोटाळा झाला नसून केंद्र सरकार व […]Read More

पर्यावरण

नागपुरातील ‘नीरी’ या राष्ट्रीय संस्थेवर सीबीआयची छापेमारी

नागपुर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या ‘नीरी’ मुख्यालयात आज सकाळपासून केंद्रीय अन्वेषण विभागने (सीबीआय) छापेमारी सुरु केली आहे. महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष पथकाने आज सकाळी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ‘नीरी’वर छापा टाकल्याची माहिती समोर येत […]Read More

राजकीय

मराठा आरक्षण बैठक बहिष्कार , विधिमंडळात गदारोळ, कामकाज दिवसभर स्थगित

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी काल सरकारने बोलावलेल्या बैठकीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बहिष्कार घातला त्यामुळे आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राजकारण तापले . हाच मुद्दा कळीचा बनवत आज सत्तारूढ आघाडीने विरोधी पक्षाच्या नेत्यांना विधिमंडळात घेरले. सत्तारूढ सदस्य आक्रमक होत त्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला त्यातून कामकाज आधी चार वेळा आणि मग दिवसभरासाठी […]Read More

विज्ञान

मंगळ मोहीम यशस्वी करून वर्षभरानंतर परतले NASA चे शास्त्रज्ञ

वॉशिग्टन डी.सी. दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या ‘NASA’ या अंतराळ संशोधन संस्थेचे गेले वर्षभर सुरू असलेले ‘Mars Mission’ ६ जुलैला पूर्ण झाले आहे . या मंगळ मोहिमेतील चार शास्त्रज्ञ हे वर्षभराच्या वास्तव्यानंतर त्यांच्या यानातून नुकतेच पृथ्वीवर परतले आहेत. या यानात मंगळासारखे वातावरण तयार करण्यात आले होते. हॅस्टन,आन्का सेलारिऊ,रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स हे […]Read More

पर्यटन

गोव्यात करण्यासारख्या गोष्टी

गोवा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गोव्याच्या किनारी राज्याला भेट देण्यासाठी फेब्रुवारी हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक आहे, विशेषतः जर तुम्ही बजेट सुट्टी शोधत असाल. वर्षाच्या या वेळी हवामान खूप आनंददायी असते आणि शिखर महिन्यांच्या तुलनेत या ठिकाणी कमी गर्दी असते, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी. इतकेच काय, तुम्‍हाला फेब्रुवारीमध्‍ये गोव्यामध्‍ये चांगली हॉटेल्स सहज मिळू शकतात कारण […]Read More

Lifestyle

शेपु चिकन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस:चिकनचे ८-१० लहान (बोनलेस) तुकडे, चमचाभर आलं-लसूण (बारीक चिरून किंवा ओबडधोबड वाटून), १ /२ छोटा कांदा बारिक चिरुन, ३-४ चमचे शेपु चिरुन, ऑलिव्ह ऑइल, चिमुटभर साखर, मीठ, व्हाइट व्हिनेगर / लिंबाचा रस, हवं असल्यास पिझ्झा सिझनींग (मी डॉमिनोज सोबत मिळणार्‍या सिझनींगचं अर्धं पाकिट वापरलं) क्रमवार पाककृती:एका फ्रायपॅनमध्ये […]Read More

विदर्भ

पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सात च्या सुमारास पश्र्चिम विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के बसले असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच मालमत्तेचे ही नुकसान झालेले नाही. मराठवाड्यात नांदेड शहराला सौम्य भूकंपाचा धक्का बसला. नांदेड शहरातील विवेकानगर, कैलास नगर तसेच ईतर भागातून नागरिक घराबाहेर […]Read More

महानगर

ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळेच असले पाहिजे

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं, याविषयावर महाराष्ट्र शासनाने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या चर्चेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्यावतीने भूमिका मांडण्यात आली की, ओबीसीचे आरक्षण हे वेगळे असले पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षण हे वेगळे असले पाहिजे. असे वंचित बहुजन आघाडीचे […]Read More

महानगर

पुरवणी मागण्या चर्चेविना ही आर्थिक गोंधळ निर्माण करणारी प्रवृत्ती

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यात आल्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब करत महाराष्ट्राच्या माथ्यावर ९४ हजार कोटींचा नवा भुर्दंड मारला आहे. या […]Read More