Month: July 2024

पर्यटन

सिद्धिविनायक मंदिर

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रभादेवी येथे असलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण प्रार्थनास्थळे आहेत. हे मंदिर प्रथम गुरुवार 19 नोव्हेंबर 1801 रोजी अभिषेक करण्यात आले होते, ही वस्तुस्थिती सरकारी नोंदींमध्ये नोंद आहे. मंदिर तेव्हा अडीच फूट रुंद असलेल्या श्री सिद्धिविनायकाची काळ्या पाषाणाची मूर्ती असलेली एक छोटी रचना होती. या […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यात सर्वत्र तुफानी पाऊस, पूरस्थितीसाठी यंत्रणा सज्ज

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २४ तासांपासून मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वत्रच पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पावसामुळे धरणे पूर्ण भरल्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिरिक्त पाण्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला आहे. पुण्यामध्ये खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे मुळा-मुठा नदी काठच्या घरांमध्ये आणि […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला ‘नो एन्ट्री’

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील लाखो स्थलांतरीतांना रोजगार देणाऱ्या महानगरी मुंबईमध्ये खासगी आस्थापनांमध्ये मराठी व्यक्तींना रोजगाराच्या संधी नाकारल्या जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून उघडकीस येत आहेत. आज यामध्ये अजून एका घटनेची भर पडली आहे. अंधेरीतील मरोळ येथील आर्या गोल्ड नावाची ही कंपनी आहे. डायमंड फॅक्टरीत प्रोडक्शन मॅनेजर पदासाठी जागा रिक्त आहे. […]Read More

देश विदेश

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल आणि अशोक हॉल या सभागृहांचे नामांतर

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती भवनात भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब उमटावं या हेतूनं ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ या दोन प्रतिष्ठित सभागृहांची नावं बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यानुसार दरबार हॉलचं नामांतर ‘गणतंत्र मंडप’ आणि अशोक हॉलचं नामांतर ‘अशोक मंडप’ असं करण्यात आलं आहे. ‘राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतींचं कार्यालय आणि निवासस्थान […]Read More

शिक्षण

पावसामुळे उद्या होणाऱ्या 10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षा ढकलल्या पुढे

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांनी सुट्टी देण्यात आली आहे. IMD ने अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या १० वी आणि १२ वी च्या पुरवणी परीक्षाही आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार […]Read More

देश विदेश

या देशात निवृत्तीचे वय होणार ७० वर्ष

बिजिंग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश अशी ख्याती असलेल्या चीनचा जन्‍मदर घसरत चालला असून वृद्धांची संख्‍या मात्र वाढत आहे.त्‍यामुळे देशात काम करणार्‍यांची संख्‍या कमी होत आहे. ही परिस्‍थिती लक्षात घेऊन चीन सरकारने निवृत्तीचे वय १० वर्षांनी वाढवून ७० वर्ष केले जाणार आहे. चीनमध्‍ये पुरुष ६० व्‍या वर्षी आणि महिला ५५ […]Read More

महानगर

मनपा कामगारांना वैद्यकीय मदत मिळणार!

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई बाहेर उपनगरात राहावयास गेलेले आहेत.त्यांना अकस्मित आजाराची बाधा झाल्यास घराजवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मात्र त्यानंतर त्याने आपल्या खात्याकडे वैद्यकीय आर्थिक मदतीस औषध उपचाराचा खर्च मागितल्यास महानगरपालिका देत नव्हती.त्यामुळे अनेक आर्थिक संकटाना कामगार,कर्मचा-यांना तोंड द्यावे लागत होते.मात्र म्युनिसिपल मजदूर […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी पाणी, सिंचन योजनांचे पंप सुरू

सांगली, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यातील एकीकडे पश्चिम भागात नदीकाठ पूरस्थिती निर्माण झाली आहे तर दुसरीकडे पूर्व भागात पाण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे म्हैसाळ योजनेतील पाणी सोडावे […]Read More

ऍग्रो

राज्यात अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. […]Read More

महानगर

सोमवार पासून मुंबईतील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय मागे

मुंबई दि.25(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्यात येणार आहे. सोमवार २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ५ […]Read More