चेरापुंजी, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जगातील सर्वात आर्द्र ठिकाणांपैकी एक, मेघालयातील चेरापुंजी हे मार्च महिन्यात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. वाहणारे धबधबे, थंड आणि आल्हाददायक वारे, आणि हिरवळीच्या टेकड्यांचे साक्षीदार होण्याची आणि या ठिकाणाचे मूळ सौंदर्य एक्सप्लोर करण्याची संधी या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खरोखरच आणखी काही विचारायला लावतील. चेरापुंजीतील […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडलेले बजेट म्हणजे निवडणूक बजेट आहे. घोषणांचा पुडका आहे. म्हणून निवडणुकीच्या वेळेला दिलेल्या आश्वासनांचे जे होते तेच या बजेटचे होणार आहे. त्यामुळे हे बजेट म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असा प्रकार महाराष्ट्राच्या जनतेला अनुभवायला मिळेल अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना ओवाळणी दिली. विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य, वंचित-उपेक्षित, आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधक-बाधक चर्चा होऊन विधीमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. शासन निर्णय काढता येतो. परंतु ही प्रक्रीया डावलून मंत्रीमडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध तीर्थक्षेत्र आणि चारधाम यात्रेसाठी राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आखून यात्रेकरूंना अनुदान देईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरच्या लक्ष वेधी सूचनेच्या उत्तरात दिली. यासाठी नियमावली केली जाईल , इच्छा असूनही पैशाअभावी यात्रेला जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन नोंदणी केली जाईल, त्यांना […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन वर्षांत दाओसला झालेले सामंजस्य करार आणि त्याची झालेली अंमलबजावणी याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढण्यात येईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत केली. शेंद्रा बीडकीन औद्योगिक पट्ट्यात जागतिक दर्जाच्या औद्योगिक सुविधा मिळत नसल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला, त्या […]Read More
जालना, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या एर्टिगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने अपघात होऊन त्यात सात जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली,नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून केली. […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची […]Read More