Month: February 2024

खान्देश

मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान

नाशिक, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार उर्दू भाषेतील प्रख्यात कवी तथा हिंदी चित्रपट दिग्दर्शक, गीतकार, लेखक गुलजार यांना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला असून, कुलगुरूंनी या पुरस्काराचे स्वरुप, तसेच या पुरस्कारासाठी जेष्ठ कवी गुलजार […]Read More

शिक्षण

सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवाच अन्यथा….

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतची दक्षता सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक शालेय शिक्षण विभागामार्फत जारी करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकविला जात नाही, अशा शाळेची मान्यता किंवा ना-हरकत […]Read More

महानगर

मुंबईतील मोकळ्या जागा मित्रांच्या घशात , सरकारी जमिनी अडाणी ना

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील बगीचे , मैदाने , मोकळ्या जागा बिल्डर मित्रांच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. ‘जो जमीन सरकारकी है..वो जमीन अदानी की है’… अशा पध्दतीने धारावीपासून विमानतळ, विमानतळ कॉलनी अशी सर्व कंत्राटे आपल्या मित्रांना देण्याचे काम सध्या सुरु आहे अशी जोरदार टीका काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली. मुंबई […]Read More

महानगर

कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार माजला असून मुंबई, नवी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून कायदा सुव्यवस्था राखण्यात या सरकारला अपयश आलं असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत केली. मुंबई,नवी मुंबईत दलालांचा सुळसुळाट असून हप्तेबाजीखोरांचे जाळ पसरले आहे. शेतकरी, बेरोजगार तरुणांना न्याय देण्यास हे […]Read More

महानगर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण समितीचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा ” या मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.२३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी असा दर्जा तात्काळ लागू करावा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तात्काळ मंजूर […]Read More

महानगर

सरकारने आर्टीची घोषणा केल्याने मातंग समाजाचे उपोषण स्थगित

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत सरकारने गांभीर्याने विचार करत अधिवेशन काळत सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या मान्य केल्याची केल्यामुळे मातंग समाज आनंदोत्सव साजरा करत आहे. मात्र सरकारने याबाबत त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी मातंग समाज करत आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था […]Read More

महानगर

मुंबईतील पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेमध्ये एकाच परिवाराची सत्ता गेली 25 वर्षे असून त्यांनी मुंबईकरांकडून तीस हजार कोटी रुपये करापोटी घेऊनही मुंबईकरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही, झालेला खर्च आणि मिळणारे पाणी याची सत्त्यता समोर येण्यासाठी “मुंबईच्या पाण्याची” एक श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, अशी मागणी करतानाच मुंबई महापालिकेच्या 24 तास […]Read More

खान्देश

मविप्रच्या  ‘ प्रज्ञा ‘ बौद्धिक संपदा केंद्राचे डॉ माशेलकरांच्या हस्ते

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिक ही ज्ञानगंगेची नगरी असून मविप्र ने उभारलेल्या प्रज्ञा केंद्राचा प्रवास हा बुद्धी आणि संपदेच्या एकत्रिकरणातून सरस्वती कडून लक्ष्मीकडे व्हावा असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी केले ते आज मविप्रच्या  ‘ प्रज्ञा ‘ बौद्धिक संपदा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या आय एम आर टी महाविद्यालय येथे बोलत होते. यावेळी संस्थेचे […]Read More

राजकीय

निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, पोलिसात दिली तक्रार

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून खुद्द मुख्यमंत्री कार्यालयानेच यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनिशी शेरे असलेली निवेदने आणि पत्र पुढील कार्यवाहीसाठी ठिकठिकाणाहून मुख्यमंत्री सचिवालयास प्राप्त होत असतात. या निवेदनांची टपाल […]Read More

राजकीय

मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा !

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९९५ साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ४० लाख झोपडीधारकांना मोफत घर देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या झोपडीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर निवारा हक्क संघर्ष समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संतोष सांजकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार […]Read More