Month: February 2024

करिअर

मध्य रेल्वेमध्ये 12वी पाससाठी 622 तंत्रज्ञांच्या जागा रिक्त आहेत

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तंत्रज्ञ, हेल्पर, लिपिक, शिपाई आणि इतर पदांच्या भरतीसाठी मध्य रेल्वेने अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑफलाइनद्वारे अर्ज भरू शकतात. रिक्त जागा तपशील: SSE: 06 पदेकनिष्ठ अभियंता (JE): 25 पदेवरिष्ठ टेक: 31 जागातंत्रज्ञ-I: ३२७ पदेतंत्रज्ञ-II: 21 पदेतंत्रज्ञ-III: 45 पदेसहाय्यक: १२५ पदेCh.OS :01 पोस्टOS: 20 पदेवरिष्ठ लिपिक: […]Read More

पर्यावरण

जगबुडीतील गाळ काढण्यासाठी अखेर पर्यावरण विभागाची मंजूरी

खेड, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खेड येथील जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाची अंतिम परवानगी मिळाली असून, चार दिवसात प्रत्यक्षात या कामाला सुरवात होणार आहे, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.आमदार कदम म्हणाले, गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेमधून ९० लाखांच्या निधीची तरतूद जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी केली होती; परंतु हे काम […]Read More

पर्यटन

केरळमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

केरळ, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  “देवाचा स्वतःचा देश” – केरळ जुलैमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत होते, भरून वाहणाऱ्या नद्या, हिरवीगार झाडे आणि नारळाची झाडे वाऱ्याच्या सुरात डोलतात. अलेप्पीच्या बॅकवॉटरचे निसर्गसौंदर्य आणि मुन्नारचे हिरवेगार हिल स्टेशन आणि अथिरापल्ली आणि वझाचलचे धबधबे पावसाळ्यात शिखरावर असतात. केरळमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे: मुन्नार, अलेप्पी, पेरियार, वेंबनाड आणि पोनमुडीकेरळमध्ये करण्यासारख्या […]Read More

महानगर

४५ लाख घरेलु कामगारांचा संपावर जाण्याचा इशारा

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरेलु कामगार समन्वय समितीच्या वतीने राज्यातील ४५ लाख घरेलु कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा कॉम्रेड उदय भट यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. राज्यातील ४५ लाख घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावेत. यासाठी […]Read More

राजकीय

फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

मुंबई दि.20:- महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नसल्याचेही त्यांनी […]Read More

पर्यटन

वसई ते भाईंदर खाडीत रो-रो सेवा आजपासून सुरु

ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र सागरी मंडळाकडून पालघर जिल्ह्यातल्या वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान “प्रायोगिक तत्त्वावर” रो-रो प्रवासी फेरीबोट सेवा आजपासून सुरु करण्यात आली. वसई-भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून वसई- भाईंदर दरम्यान तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या […]Read More

राजकीय

मराठ्यांना शिक्षण , नोकरीत दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक विधिमंडळात

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठयाना नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही सभागृहात मांडले आणि केवळ त्यांच्या भाषणानंतर कोणतीही चर्चा न होताच ते मंजूर करण्यात आले.हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलनं […]Read More

मराठवाडा

जरांगे म्हणतात, आम्हाला ओबिसीतूनच आरक्षण हवे, पुन्हा तीव्र आंदोलन

जालना, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आम्ही या आधीही मराठा आरक्षणाचे स्वागतच केले होते. मात्रकोट्यावधी मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातूनच हवे अशी आहे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा,जे आमहाला हवं आहे ते आम्ही मिळवणारच , उद्या आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार आहोत,ओबीसी आरक्षणातच आमचं हक्काचं आरक्षण आहे त्यावर आम्ही ठाम आहोत अशी भूमिका मनोज जरांगे […]Read More

राजकीय

राज्यपालांच्या अभिभाषणाने विधानमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात

मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने आज राज्य विधानमंडळाच्या २०२४ वर्षातील पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान मंडळ प्रांगण येथे आगमन प्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. त्यानंतर […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आदींनीही जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प […]Read More