Month: December 2023

शिक्षण

मुलांची झोप पुरेशी व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदला

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अलीकडच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागी राहतात. परंतु शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते , त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. मुलांच्या दप्तराचा भार हलका […]Read More

मराठवाडा

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर ब्राह्मण समाजाचे उपोषण आठव्या दिवशी मागे

जालना, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या २८ तारखेपासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी जालना शहरातील गांधी चमन येथे आमरण उपोषणाला बसलेल्या दीपक रणनवरे यांचे उपोषण सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे. दिपक रणनवरे हे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासोबतच मुलांना मोफत शिक्षण मिळावे तसेच सर्व शैक्षणिक सुविधा मोफत मिळाव्या या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले होते.उपमुख्यमंत्री […]Read More

क्रीडा

मुंबई उपनगर पूर्व, पश्चिम, पुणे ग्रामीण उपांत्य फेरीत

ठाणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उपनगर पश्चिम संघाने पूर्व संघाला पराभवाचा धक्का देत प्रशांत जाधवर फाऊंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीत पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम, […]Read More

करिअर

करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या अथक परिश्रमातून भावी पिढी घडत असते. मुलांना स्वप्न बघण्याचा, उंच भरारी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या पंखांना बळ देण्याची जबाबदारी शासनाची आहे. करिअर मार्गदर्शन उपक्रमातून कोणत्याही शाळेने ५० विद्यार्थ्यांना एकत्र आणून एखादे कौशल्य आत्मसात करण्याचे ठरवले तर त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करणार […]Read More

राजकीय

मोदींच्या गॅरंटीने महाराष्ट्र, मुंबईचा गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र आणि मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलंक लावला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या […]Read More

महानगर

राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद आंदोलन

ठाणे, दि. ५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी आज, मंगळवारी एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले होते. सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ ठाण्यासह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले. राज्यातील ६०० तहसीलदार आणि २,२०० नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाले. या […]Read More

सांस्कृतिक

भिडेवाडा मध्यरात्री सरकारजमा, इमारत जमीनदोस्त

पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी म्हणजे काल रात्री सुरू केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त झाल भिडेवाड्यात राष्ट्रीय स्मारक केले जावे, यासाठी महापालिकेत […]Read More

अर्थ

सेन्सेक्स-निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत) : सलग पाचव्या दिवशी भारतीय बाजारात तेजी पसरताना दिसली.तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विजयामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. राज्याच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भाजपला काही तरी झटका बसेल अशी चिंता होती […]Read More

Uncategorized

काही वेगळे खावेसे वाटत असेल तर कॉर्न रव्याचे बॉल्स बनवा.

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रोज सकाळी उठल्यावर तेच ब्रेड, ऑम्लेट, पोहे, ओट्स, चिऊला खाण्याचा कंटाळा आला आहे का? जर तुम्हाला काही नवीन करून पहायचे असेल तर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत नाश्ता आणि स्नॅक्ससाठी कॉर्न रव्याचे गोळे बनवू शकता. हे छोटे गोळे केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर रवा आणि कॉर्न खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे […]Read More

पर्यटन

सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कन्याकुमारी, जे भारतीय मुख्य भूमीचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, हे देशातील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात येथे सहलीसाठी येणे हा अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांचा संगम पाहण्याचा एक वेगळा आणि मजेदार अनुभव असू शकतो, ज्यामध्ये पाणी सतत किनाऱ्यावर वेगाने आदळते. याशिवाय, शहरात अनेक […]Read More