Month: November 2023

मराठवाडा

अवकाळी पावसाने कापूस, तूर ,ज्वारीचे मोठे नुकसान

जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने थैमान घातले. जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टीने कपाशी, तूर या खरीप पिकांसह रब्बी ज्वारीचे आणि फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या तूर पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे.कापसाच्या ही वाती झालेल्या असून बहरात आलेली ज्वारी ही आडवी झाली आहे. गोदावरी […]Read More

महिला

रुग्णालयाच्या दारातच महिला प्रसूती प्रकरणी डॉ. तृणाली महातेकर निलंबित

कल्याण, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तीन महिन्यापूर्वी एका गरोदर महिलेस प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता तिला दाखळ करुन घेतले नाही. तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली. या प्रकरणी महापालिका प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीने डॉ. तृणाली महातेकर यांना जबाबदार धरले असून त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ९ सप्टेंबर सायंकाळी ८ […]Read More

पर्यावरण

कौमी सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यावरण संवर्धन

महाराष्ट्र, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने संत तुकारामनगर येथे कौमी सप्ताह दिनानिमित्त विविध उपक्रमांनी पर्यावरणाचे संवर्धन केले. यानिमित्त ‘माझी वसुंधरा’ हा उपक्रम घेण्यात आला.सूर्यकांत मुळे म्हणाले, ‘‘जागतिक पर्यावरण दिन हा पाच जूनलाच केला जातो असे नाही. हवेचे प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, जागतिक तापमान वाढ यासाठी जनजागृती पर्यावरण हे व्यासपीठ आहे. […]Read More

पर्यटन

डिसेंबरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक

सोनमर्ग, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिसेंबरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी आणखी एक विलक्षण हिल स्टेशन म्हणजे सोनमर्ग. समुद्रसपाटीपासून 2800 मीटर उंचीवर वसलेले हे ठिकाण सत्सर आणि गडसर तलावांसह काही शांत तलावांचे घर आहे. वर्षानुवर्षे, ट्रेकिंग, स्कीइंग आणि हायकिंग यांसारख्या साहसी खेळांद्वारे या ठिकाणाने आपले नाव लोकप्रिय केले आहे आणि परिणामी, साहसप्रेमी वर्षभर सोनमर्गला […]Read More

करिअर

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सुपीरियर ज्युडिशियल सर्व्हिस पोस्टसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार पोस्टाने अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: हरियाणा सुपीरियर ज्युडिशियल सर्व्हिस: 25 पदेपंजाब सुपीरियर ज्युडिशियल सर्व्हिस: 21 पदेएकूण पदांची संख्या: ४६शैक्षणिक पात्रता: किमान सात वर्षे वकील म्हणून नावनोंदणी. या काळात वकील म्हणून प्रॅक्टिस केलेली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

समाधी सोहळ्यासाठी पांडुरंगाचे आळंदीकडे प्रस्थान

सोलापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुकांचे आणि संत नामदेव महाराजांच्या पादूकांचे आळंदीकडे प्रस्थान झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यावेळी साक्षात पांडुरंग उपस्थित होते. असा उल्लेख नामदेव महाराजांचे अभंगात येतो. त्यामुळे परंपरेप्रमाणे प्रतिवर्षी कार्तिक पौर्णिमे दिवशी नामदेव महाराजांचे आणि पांडुरंगाच्या पादुका पंढरपुरातून आळंदीकडे पायी वारीसाठी निघतात. तब्बल दहा दिवसांचा […]Read More

मनोरंजन

धर्मवीर – २ या चित्रपटाचा झाला मुहूर्त

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर-2 या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यात होते. त्यांच्याहस्ते या चित्रपटाचा मुहूर्त झाला. याआधी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचा दुसरा भाग आता येत आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, धर्मवीर-2 […]Read More

खान्देश

अवकाळी पावसामुळे केळी, द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिक, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कालपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे खानदेशात बहुतांश जिल्ह्यात केळी, टोमॅटो आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. केळीच्या बागा उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड आणि येवला तालुक्यामध्ये रविवारी […]Read More

विदर्भ

अवकाळी पावासाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना मदत

नागपूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसा संदर्भात राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करतोच आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितले. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल […]Read More

पर्यटन

कोल्हापूरच्या विमानतळावर आता या सुविधाही उपलब्ध होणार

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळेे आगामी डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे अपेक्षित आहे. कमी दृश्यमानता असतानाही विमान उतरण्यासाठी आयएलएस सिस्टीम आणि १८० सिटर एअर बस सुविधा […]Read More