Month: November 2023

करिअर

सेनादलात प्रवेश हवा, मग हे पहा

मुंबई, दि २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सेनादलात प्रवेश हवा आहे मग इथे लक्ष द्या. श्री शिवाजी मंदिर आणि कॅप्टन वंजारी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच छत्रपती हायर एज्युकेशन इंटलेक्चुअल फोरम यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू सभागृह, तिसरा मजला, शिवाजी मंदिर,दादर येथे शनिवार दिनांक 25/11/2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता यासंदर्भात एक व्याख्यान / मार्गदर्शन आयोजित करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्याने दान केली आपली सर्व संपत्ती प्रभू राम

भोपाळ, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारमध्ये गृहसचिवपद भूषवलेले सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एस. लक्ष्मी नारायणन हे त्यांची आयुष्यभराची कमाई श्रीरामाचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील मंदीरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्याच्या मूर्तीसमोरच पाच कोटी रुपये खर्चून १५१ किलो वजनाचा रामचरितमानस हा ग्रंथ येथे स्थापित केला जाणार आहे.यासाठी लक्ष्मी नारायणन त्यांची आयुष्यभराची कमाई रुपये ५ […]Read More

ट्रेण्डिंग

Google Pay वापरकर्त्यांसाठी कंपनीकडून महत्त्वाचा इशारा

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगल कंपनीचं Google Pay हे भारतातील आघाडीचे UPI पेमेंट App आहे. देशातील लाखो लोक Google Pay द्वारे दररोज व्यवहार करत असतात.अन्य अनेक UPI प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असूनही गुगल वरील विश्वासामुळे वापरकर्ते Google Pay चा वापर करण्यास प्राधान्य देताना दिसतात. मात्र हे व्यवहार करताना चुक होऊन वापरकर्त्यांचे नुकसान होऊ नये […]Read More

बिझनेस

या राज्यात Reliance करणार 20 हजार कोटींची गुंतवणूक

कोलकाता, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :काही वर्षांपूर्वी टाटा कंपनीला सळो की पळो करून राज्याबाहेर पळवून लावणाऱ्या पश्चिम बंगाल राज्यात आता रिलायन्स इंडस्ट्रीज 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांत केली जाणार आहे. कोलकाता येथे सुरू असलेल्या ७ व्या बंगाल […]Read More

ट्रेण्डिंग

चीन सरकारने बंद केल्या शेकडो मशिदी

शिंजिंयांग, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील मशिदींमध्ये संशयास्पद घडामोडी घडत असल्याचा संशय व्यक्त करत चीनने देशातील शेकडो मशिदीं बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. जगभरातील मुस्लीम देशांशी आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करत चीनचे मुस्लिम देशांसोबत चांगले संबंध निर्माण केले आहेत. पाकीस्तान सारख्या देशाला भरपूर आर्थिक मदत देऊन चीन या देशात हस्तक्षेप करत आहे. असे […]Read More

अर्थ

नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने जप्त केली ७५२ कोटींची

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल हेराल्ड आर्थिक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ७५२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे दिल्लीतील आयटीओ परिसरातील कार्यालय, लखनौमधील नेहरू भवन आणि मुंबईतील हेराल्ड हाउस यांचा समावेश आहे. पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच काँग्रेसशी संबंधित संस्थेवर ही कारवाई […]Read More

महाराष्ट्र

राज्यात या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून राज्यातून मान्सून पूर्णपणे परत माघारी गेल्यानंतर दिवाळी नंतरच्या कालावधीत अवकाळी पाऊस होत आहे. यंदाही या अवकाळी पावसाची पूर्व स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.आज संध्याकाळपासून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या […]Read More

ट्रेण्डिंग

संगमनेर येथे रंगणार शिक्षकांचा कराओके गायन स्पर्धेचा महाअंतिम सोहळा

मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय शिक्षक साहित्य-कला-क्रीडा मंंडळ (रजि) आयोजित कराओके गीत गायन स्पर्धेत महाराष्ट्रातील कोकण, नासिक, मराठवाडा, पुणे, नागपूर, अमरावती या सहा विभागातील विभागीय स्तरावरील विजयी ४२ स्पर्धक शिक्षकांच्या या राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेत आपल्या गायनाचे कसाब दाखवणार आहेत. संगमनेरच्या स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे (नाना) सहकारी पतसंस्था सभागृह, संगमनेर येथे […]Read More

महानगर

अनुसूचित जमातींच्या विविध मागण्यासाठी संविधान दिनानिमित्त महारॅली

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : जनजाति सुरक्षा मंचाद्वारे ‘डीलिस्टिंग’ (धर्मांतरित व्यक्तींना अनुसूचित जमातींच्या यादीतून वगळणे ) या मागणीसाठी रविवार २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने भव्य डी लिस्टिंग रॅलीचे आयोजन दादर ते वरळी करण्यात आले असल्याची माहिती जनजाति सुरक्षा मंचाचे कोकण प्रांत संयोजक विवेक करमोडा यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबई व नवी मुंबईत लाखोंचा गुटखा, पान मसाला जप्त

मुंबई दि 21( एम एमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देशनानुसारअन्न व औषध प्रशासनानर(एफडीए ) मंगळवारी मुंबईतील बोरिवली, परळ, दादर, जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड पश्चिम येथे कारवाई करून १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा गुटखा व पान मसाला जप्त केला असून याप्रकरणी ११ जणांना अटक करण्यात आली. अन्न […]Read More