Month: October 2023

करिअर

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RCIL) मध्ये 81 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RCIL) द्वारे भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उमेदवार Railtel Corporation च्या अधिकृत वेबसाइट, railtelindia.com वर जाऊन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक): 26 पदेउपव्यवस्थापक (तांत्रिक): 27 पदेउपव्यवस्थापक (विपणन): १५ पदेसहाय्यक व्यवस्थापक (वित्त): 6 पदेसहाय्यक व्यवस्थापक (HR): 7 पदेशैक्षणिक पात्रता: एचआर/फायनान्स/मार्केटिंग/बीई/बीटेक/बीएससी अभियांत्रिकी/एमएससी/पदवी/संबंधित […]Read More

राजकीय

जरांगे पुन्हा उपोषणावर , सरकारच्या हालचाली सुरू

जालना , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केल्यानंतर, सरकारी हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. आज सकाळपासून आंतरवली सरावटी इथे जारंगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली, यावेळी पाणी , अन्न, सलाईन ,उपचार यापैकी काहीही घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. […]Read More

राजकीय

पंतप्रधान उद्या राज्यात , शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात

अहमदनगर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी ह उद्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार असून त्यांच्या हस्ते शेतकरी सन्मान योजना , शिर्डी विमानतळ विस्तार योजना , निळवंडे धरण जलपूजन आदी अनेकविध विकास कामे सुरू होणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी […]Read More

पर्यटन

तब्बल 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा राजवाडा

ग्वाल्हेर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जय विलास पॅलेस 1874 मध्ये ग्वाल्हेरचे तत्कालीन महाराज, मराठा सिंधिया राजवंशातील जयाजीराव सिंधिया यांनी बांधले होते. 1875 मध्ये तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, किंग एडवर्ड VII यांचे भव्य स्वागत करण्यासाठी हा भव्य राजवाडा बांधण्यात आला होता. तब्बल 1 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा राजवाडा प्रत्येक वेळी एक अपवादात्मक पराक्रम […]Read More

महिला

महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी या खेळाडूची नियुक्ती

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BCCI ने अमोल मुझुमदार यांच्या हाती भारतीय महिला वरिष्ठ संघाचे प्रशिक्षपद सुपूर्द केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या संघाचे प्रशिक्षकपद रिकामे होते. महिलांचा संघ हा चांगली कामगिरी करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून भारतीय महिला संघात काही वाद पाहायला मिळाले होते. त्यामुळे बीसीसीआयने अमोल यांच्यासारख्या शांत प्रशिक्षकांच्या हातात […]Read More

देश विदेश

NCERT पाठ्यपुस्तकांमध्ये आता फक्त ‘भारत’

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभर आपल्या देशाला भारत म्हणावे की इंडिया याबाबत राजकीय चर्चा सुरु आहे. यातच आता NCERT ने ठोस भूमिका घेत पाठ्यपुस्तकांतील INDIA हा शब्द काढून त्याजागी भारत या संबोधनाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये टप्प्याटप्प्याने काही ना काही बदल […]Read More

देश विदेश

या देशात देशभक्ती शिक्षण कायदा मंजूर

बिजिंग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन या देशामध्ये रुढार्थाने एकपक्षिय शासन आहे. येथील विद्यार्थी आणि नागरिक देशभक्ती विसरत आहेत, असा दावा करत येथील सरकारने आता देशभक्तीपर शिक्षण कायदा लागू केला आहे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चिनी तरुणांमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि कम्युनिस्ट पक्षाची निष्ठा जागृत करणे हा या कायद्याचा उद्देश आहे. सरकारने म्हटले आहे […]Read More

देश विदेश

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताकडून ५० पदकांची कमाई

गाऊंझाऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमध्ये पार पडलेल्या आशियायी खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरी केली. आता येथेच सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची यशस्वी कामगिरी करत आहेत. 22 ते २८ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सध्या 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह 50 पदकांसह पाचव्या […]Read More

मनोरंजन

‘न्यूटन’ फेम अभिनेता होणार निवडणूक आयोगाचा ‘नॅशनल आयकॉन’

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच राज्यांच्या निवडणूका आणि आगामी लोकसभा निवडणूक यांसाठी अगदी कमी अवधी शिल्लक आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्वतोपरिने प्रयत्न केले जात आहेत. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्यावर निवडणूक आयोगाने एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. निवडणूक आयोगाने राजकुमार राव याला ‘नॅशनल आयकॉन’ बनवण्याची घोषणा केली […]Read More

राजकीय

भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून फसवले

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज […]Read More