Month: October 2023

पर्यटन

पूर्वी मंकल म्हणून ओळखला जाणारा, गोलकोंडा किल्ला

हैदराबाद, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पूर्वी मंकल म्हणून ओळखला जाणारा, गोलकोंडा किल्ला काकतिया राजांनी बांधला आणि राणी रुद्रमा आणि तिचा उत्तराधिकारी प्रतापरुद्र यांनी पूर्ण केला. तथापि, आज आपण पाहत असलेली रचना कुतुबशाही घराण्यातील सुलतान कुली कुतुब-उल-मुल्क यांनी नूतनीकरण केली होती, ज्याने गोलकोंडा हे आपल्या राज्यकारभाराचे केंद्र म्हणून निवडले होते. हा किल्ला एक अभियांत्रिकी चमत्कार […]Read More

महानगर

भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाची नजर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल ,वनस्पती व तूप इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणी करायची विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. […]Read More

देश विदेश

आता शेकडो कोटींचे भ्रष्टाचार नाहीत तर लोककल्याण योजना

शिर्डी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान शिर्डी जवळील काकडी येथे झालेल्या सभेत याआधीच्या भाजपेतर सरकारांनावर टिकेची झोड उठवली. या आधी महाराष्ट्राते शेकडो कोटींचे भ्रष्टाचार झाले तर आता आमच्या काळात शेकडो कोटींच्या लोककल्याण योजना आमलत आणल्या जातात असे प्रतिपादन करत त्यांनी भाजपाच्या कार्यकाळात झालेल्या लोककल्याणाच्या योजनांचा तपशील […]Read More

देश विदेश

कॅनडासाठी Visa सेवा पुन्हा सुरू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत व कॅनडामधील गढुळलेले संबंध आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. राजनैतिक संघर्ष निवळण्याच्या दृष्टीने भारताने पाऊल टाकले आहे. भारताचा व्हिसा देणारी कॅनडामधील सेवा केंद्रे आज (दि. २६) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व कॅनडाच्या प्रशासनाने […]Read More

देश विदेश

८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना कतारने सुनावली फाशीची शिक्षा

दोहा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतासाठी एक भयंकर बातमी समोर आली आहे. कतार देशाने 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या बातमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली असून आम्ही याप्रकरणी सातत्यानं कतारच्या संपर्कात आहोत असं म्हटलं आहे. या निर्णयाविरोधात भारतीय परराष्ट्र […]Read More

ट्रेण्डिंग

स्वस्तात खरेदी करा १४ सीटर कार

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोठ्या कुटुंबाला प्रवासाला जाण्यासाठी किंवा मित्रमंडळी एकत्र ट्रिपला जाण्यासाठी मोठ्या कारची गरज असते. ट्रिपच्या मजामस्तीच्या वातावरणात एकाच गाडीतून प्रवास करणे आनंददायी असते. मात्र हा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा म्हणून कोणत्या गाडीची निवड करावी हा प्रश्न नेहमीच पडतो. तर आता १४ आसन क्षमता असलेली डिझेलवर चालणारी स्वस्तात मस्त […]Read More

महानगर

प्रख्यात कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

नवी मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात वारकरी कीर्तनकार आणि निरुपणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (89) Baba Maharaj Satarkar यांचे आज निधन झाले. नवी मुंबईती नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ (Nerul) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज […]Read More

ट्रेण्डिंग

Google Pay वरून घेता येणार कर्ज

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google Pay हे लोकप्रिय पेमेंट App आता एक खूपच छान सुविधा घेऊन आले आहे. गुगल इंडियाने छोट्या व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन छोट्या कर्जाची सुविधा सुरू केली आहे. व्यापाऱ्यांना अनेकदा छोटी कर्जे आणि अधिक सोप्या परतफेड पर्यायांची आवश्यकता असते. त्यांच्या याच गरजा पूर्ण करण्यासाठी, डीए फायनान्ससोबत गुगल पेवर 15,000 इतके […]Read More

महिला

झोमॅटोकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जेव्हा आपण एखाद्या संस्थेत काम करतो तेव्हा आपल्याला कर्मचारी म्हणून काही सुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेणे हा आपला हक्क आहे. यामध्ये प्रसूती विमा योजना किंवा तत्सम योजनांचा समावेश असू शकतो, ज्या महिला कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात. अलीकडेच एका प्रसिद्ध कंपनीने आपल्या महिला कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. […]Read More

गॅलरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन

शिर्डी, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण […]Read More