Month: October 2023

मराठवाडा

मराठा आरक्षण आंदोलक झाले हिंसक

बीड, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत एका जमावाने बीड मधून कोल्हापूरला निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस वर दगडफेक केली आणि त्यानंतर बस पेटवल्याची घटना बीड तालुक्यातील आहेर वडगाव परिसरात घडली. वेळीच प्रवासी उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे. […]Read More

विज्ञान

शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळ्या जादूचा बोलबाला

चंद्रपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राजुरा शहरात शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत निवडणुकीत काळ्या जादूचा धक्कादायक बोलबाला उघड झाला आहे. पीडितांच्या घरी जाऊन प्रतिस्पर्धी गटाच्या उमेदवारांनी भारलेल्या बाहुल्या आणि हळद-कुंकू लावलेल्या वस्तू टाकल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी अद्याप मात्र गुन्हा दाखल केलेला नाही.  चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात एका शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत काळ्या जादूचा बोलबाला उघड […]Read More

देश विदेश

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांची सामुहिक आत्महत्या

सुरत, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमधील सुरत शहराची सकाळ आज एका भीषण बातमीने उजाडली. दिल्लीतील बुरारी आत्महत्या प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना गुजरातमधील सूरत इथं घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांनी आत्महत्या केली आहे, यामध्ये तीन बालकांचाही समावेश आहे. या प्रकरणामुळं देशात खळबळ उडाली आहे. या कुटुंबानं लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमुळं ही […]Read More

मनोरंजन

‘चला हवा येऊ द्या’ घेत आहे प्रेक्षकांचा निरोप

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. निलेश साबळे यांच्या खुमासदार लेखन दिग्दर्शनाखाली गेली ९ वर्षे दर आठवड्याला झी मराठी वाहिनीवर सुरु असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.. चला हवा येऊ द्या दिग्दर्शक – लेखक – अभिनेता निलेश साबळेने स्वतः ही माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या […]Read More

देश विदेश

ऐतखाऊ मुलांविरोधात आईने घेतली कोर्टात धाव

पाविया,इटली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चाळीशी पार करूनही कोणताही कामधंदा न करता ऐतखाऊपणा करणाऱ्या आणि वर मनस्ताप देणाऱ्या मुलांविरुद्ध आईनं कोर्टात धाव घेतली आहे. ही घटना आहे, इटलीच्या पाविया शहरातील. येथे एक ७५ वर्षीय महिला दोन मुलांसोबत राहते. या मुलांचं वय ४० आणि ४२ वर्षे आहे. या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असून तिचं […]Read More

देश विदेश

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी जिंकली १११ पदके

गाऊंझाऊ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील गाऊंझाऊ येथे सुरु असलेल्या आशियाई पॅरा गेम्सची आज सांगता झाली. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा शंभरपेक्षा जास्त पदकं मिळवत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय पॅरा अ‍ॅथेलिट्सने १११ पदकं जिंकली आहेत. आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी २९ सुवर्ण, ३१ सिल्वर, आणि ५१ ब्रान्ज पदकं जिंकून पदतालिकेत […]Read More

शिक्षण

या राज्यात मदरशांमध्ये शिकवले जाणार संस्कृत आणि वेदाभ्यास

डेहराडून, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुस्लिम विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये आता हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या वेद आणि संस्कृत भाषाही शिकवण्यात येणार आहे, उत्तराखंडच्या मदरसा बोर्डानं हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. उत्तराखंड मदरशा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी यांनी मदरशांमध्ये वेद आणि संस्कृत शिकवलं जाणार असल्याची घोषणा केली. इथल्या साबिर दर्ग्याला त्यांनी […]Read More

महानगर

महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार

ठाणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “मराठीतील सुपरस्टार” महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून याची घोषणा आज ठाण्यात ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केली. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना जाहीर झालेला गंधार गौरव पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२३ रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० […]Read More

सांस्कृतिक

या दरम्यान रंगणार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव

पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यावर्षी १३ ते १७ डिसेंबर, २०२३ दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे ६९ वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे महोत्सव […]Read More

महाराष्ट्र

प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी

जळगाव, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र आणि राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात […]Read More