Month: October 2023

ऍग्रो

रखडलेल्या कृषी पंप वीज जोडणी पूर्ततेसाठी योजनेला मुदतवाढ

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येईल. Extension of scheme for completion of stalled agriculture […]Read More

राजकीय

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नागपूरला ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करुन ४५ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. Five additional Family Courts at Nagpur नागपूर येथे ४ कौटुंबिक न्यायालये असून वाढत्या कौटुंबिक विवादांच्या प्रकरणांमुळे ही ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात […]Read More

महानगर

नांदेड येथील घटनेत चौकशीअंती दोषींवर कारवाई

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती […]Read More

महानगर

दादर येथील महात्मा गांधी स्विमिंग पूल मध्ये सापडले मगरीचे पिल्लू

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज पहाटे सकाळी साडे पाचच्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले‌ असून ते वनखात्याच्या ताब्यात देण्यात आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक ती […]Read More

राजकीय

दिवाळीनिमित्त पुन्हा आनंदाचा शिधा ,मैदा – पोह्याचा देखील समावेश

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन […]Read More

बिझनेस

इमारतींच्या पुनर्विकासाला वेग, विरोध करणाऱ्या सदनिका धारकांना बाहेरचा रस्ता

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट (महाराष्ट्र वेश्म मालकी अधिनियम १९७० मधील नोंदणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुनर्विकासास विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश स्वरुपात विधेयक आणण्यात येईल. […]Read More

राजकीय

अजितदादा नाराज , महायुतीत बिघाडी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजपाने २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेली राजकीय गणिते जुळवण्यासाठी सोबत घेतलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मागणी पूर्ण होत नसल्याने त्यांची नाराजी झाली असून त्यामुळे महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. भाजपाने राज्यात सत्तेसाठी आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीतील नाराज बहुसंख्य आमदारांना आपल्याकडे खेचून सत्तापालट केला मात्र स्वतःच्या आमदारांना सत्ता […]Read More

विज्ञान

हे आहेत यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार मानकरी

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या अ‍ॅनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणं विकसित केली आहेत, ज्याद्वारे अ‍ॅटोसेकंदात इलेक्ट्रॉनचं जग पाहता येईल. अ‍ॅटोसेकंद म्हणजे १/१,000,000,000,000,000 वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचं वय शोधून काढलं. ब्रह्मांडाचं वय जाणून […]Read More

देश विदेश

चीनकडून फंडींग घेतल्याच्या आरोपावरून ‘न्यूज क्लिक’वर कडक कारवाई

नवी दिल्ली, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिनी फंडिंगच्या आरोपांमुळे न्यूज क्लिक या न्यूजपोर्टलवर आज सकाळपासून दिल्ली पोलिस कडक कारवाई करत आहेत. 100 पोलिसांची टीम जवळपास 8 ते 9 पत्रकारांच्या वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेतला. न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळाशी संबंधित दिल्लीत अनेक पत्रकार आणि लेखकांच्या घरी पोलिसांच्या विशेष पथकाची धाड पडली आहे. पत्रकार अभिसार शर्मा यांच्यासह […]Read More

क्रीडा

Asian Games: यशस्वी जैस्वालची ऐतिहासिक खेळी

गाउंझाऊ, दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. भारताच्या या युवा सलामीवीर फलंदाजाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात शतक झळकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. पुरुष क्रिकेटच्या उपांत्यपूर्व फेरीच्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने ही धडाकेबाज […]Read More