Month: October 2023

राजकीय

बोरवणकर यांच्या आरोपांमधील सत्यता जनतेसमोर आणा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी “मॅडम कमिशनर” या आत्मचरित्रात सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबतचे वृत्त सातत्याने माध्यमातून येत आहे. पुण्याबरोबरच अन्य ठिकाणच्या जमिनीसंदर्भात, बदलीसंदर्भातही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर या माजी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केलेल्या सर्व आरोपांची शासनाने गांभिर्याने दखल घेण्याची […]Read More

बिझनेस

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हस्ते […]Read More

राजकीय

ग्रामपंचायत निवडणुका नामनिर्देशनपत्रासाठी मुदतवाढ

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

तुळजाभवानी माता अवतरली पंढरपुरात…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळे निमित्त आज पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस तुळजाभवानी रूपात सजवण्यात आले होते. तुळजाभवानी मातेची पारंपरिक बैठक रुक्मिणी मातेस करण्यात आली. यावेळी 23 प्रकारचे सुवर्णालंकार परिधान करण्यात आले होते. बैठक स्वरूपातील रुक्मिणी माता पाहिल्यावर करकटावर असणाऱ्या रुक्मिणी मातेचा आभास कुठेही होताना दिसत नव्हता. साक्षात तुळजापूरची भवानी माता पंढरपूर […]Read More

गॅलरी

अंदमानच्या राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल अॅडमिरल डी. के. जोशी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन जोशी यांचे स्वागत केले. Governor of Andaman meets Chief Minister ML/KA/PGB17 Oct 2023Read More

मराठवाडा

‘भरोसा सेल’ची सेवा प्रत्येक तालुकास्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावा

लातूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणारे समुपदेशन महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरही भरोसा सेलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. लातूरच्या […]Read More

पर्यावरण

स्वच्छ हवा कार्यक्रम

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धूळ नियंत्रित करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये सात कलमी कार्यक्रम जाहीर केला. एप्रिल मध्ये तीन कृती दले स्थापन झाली. बांधकामांच्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास, नियमांचे पालन न करणाऱ्या विकासक, कंत्राटदारावर कारवाई असे स्वरूप ठरले. पण त्याची नियमावली करण्याचे आदेश काढायला पालिकेला नऊ महिने लागले आहेत. […]Read More

बिझनेस

“गर्वसे कहो हम एमआयएम हैं ” सुध्दा भविष्यात म्हणतील

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची घोषणा “गर्वसे कहो हम हिंदू है” होती. आता उद्धव ठाकरे यांनी “गर्वसे कहो हम समाजवादी हैं ” अशी केली आहे. आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचल्यावर “गर्वसे कहो हम एमआयएम हैं” असेही व्हायला कमी पडणार नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. […]Read More

बिझनेस

राज्यात रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मिशन

ठाणे, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होण्यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन” च्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. पहिल्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार […]Read More

महानगर

बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर […]Read More