Month: October 2023

राजकीय

मुख्यमंत्री शिंदे यांनी साधला जरांगे यांच्याशी संवाद

मुंबई, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा अनुषंगाने या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असे सांगण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे […]Read More

राजकीय

आम्हाला अर्धवट आरक्षण नको , विशेष अधिवेशन बोलवा…

जालना, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊ पण नका. आम्ही आमच्या बांधवांची बैठक बोलावली, आम्ही त्या बैठकीत त्या विषयी चर्चा करणार आहेत अशी आपली भूमिका आज अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे. व्यवसायावर जाती निर्माण झाल्या आहेत, तुम्ही […]Read More

ट्रेण्डिंग

शाहू महाराज यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

जालना, दि. ३१(एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज अंतरवाली सराटी येथे येऊन मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे छत्रपतींनी त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या भावनेचा कदर करत मनोज जरांगे यांनी पाण्याचे दोन घोट […]Read More

राजकीय

महाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया विभागाला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार

मुंबई दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित विचार संगम या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ’प्रभासाक्षी’ […]Read More

गॅलरी

इंदिरा गांधी, सरदार पटेल यांना मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंत्रालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ आणि माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या […]Read More

राजकीय

सरकारी कर्मचारी मारहाण प्रकरणी भाजपा आमदार दोषी

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील एका न्यायालयाने आज सायन कोळीवाड्यातील भाजप आमदार कॅप्टन तमिळ सेलव्हनसह अन्य चार आरोपींना ड्युटीवर असताना बीएमसी अधिकार्‍यांना मारहाण आणि त्यांना धमकावल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी त्यांना आयपीसी कलम३३२,३५३,१४७,१४५,१४९ आणि ३४१ अंतर्गत दोषी ठरवले , यासाठी प्रत्येक दोषीला १३ हजार ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. […]Read More

क्रीडा

इंटरनॅशनल चॅम्पियनशिप जिंकून अंगद बेदीने वाहिली वडीलांना श्रद्धांजली

दुबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलीवूड अभिनेता अंगद बेदीने दुबई येथे झालेल्या ओपन इंटरनॅशनल मास्टर्स 2023 अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा कारकीर्दीची सुरुवात केली. या स्पर्धेत त्याने 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.अंगद हा भारतीय फिरकी गोलंदाजांना जगभरात ओळख मिळवून देणारे महान गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. नुकतेच बिशन सिंग बेदी यांचे […]Read More

ट्रेण्डिंग

परराज्यातील औषधांवर नियंत्रण ठेवण्यासाठी FDA चे संकेतस्थळ

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात्र औषधांची खरेदी केली जाते. या राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या औषधांमध्ये अप्रमाणित औषधांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे मिळण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने बनावट औषधांचा राज्यातील शिरकाव […]Read More

पर्यटन

‘वंदे साधारण’ ट्रेन मुंबईत दाखल

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत या अत्याधुनिक ट्रेन्समुळे प्रवासाचा वेळ कमी झाला असून प्रवास अधिक आरामदायकही झाला आहे. मात्र या ट्रेन्सचे तिकिट खुूप जास्त आहे, ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही अशी टिका गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमांतून सुरु होती. यावर उपाय म्हणून सरकार आता सर्वसमान्यांच्या आवाक्यातील ‘वंदे […]Read More

Lifestyle

या देशात गेल्या तीन महिन्यात जन्मले नाही एकही बाळ

रोम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील पर्यटकांचा आवडता असलेला इटली हा देश सध्या एका गंभीर समस्येला सामोरा जात आहे. इटलीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. ही समस्या इतकी मोठी आहे की इटलीचे पंतप्रधान या प्रश्नाकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत आहेत. नॅशनल स्टॅटि्क्स ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, […]Read More