Month: September 2023

पर्यटन

देशातील पहिली ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बस सुरू

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकार सध्या पर्यायी हरित इंधन स्रोतांच्या अवलंबासाठी प्रयत्नशील आहे. यातीलच एक उपक्रम म्हणून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज दिल्लीत भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला हिरवा झेंडा दाखवला. यात 2 बसेस असून, ज्या 3 लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक […]Read More

महानगर

अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारवायांचा धडाका सुरु ;कोट्यवधी रुपयांचा

मुंबई दि.25( एम एमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, मिस इत्यादी सनासुदीच्या पार्श्वभुमीवर खाद्यतेल, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई विक्रेते, इत्यादी एफ.डी.ए. च्या रडारवर असून सदर अन्न पदार्थांमध्ये तपासणी दरम्यान भेसळ आढळून आल्यास भेसळखोरांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी दिलेले आहेत. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी […]Read More

खान्देश

कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे, चुकीचेच!

नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही. अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नोव्हेंबरमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरीचा थरार

पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या तसेच वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा भव्य स्वरूपात होईल, अशी […]Read More

राजकीय

अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे आणि चालवण्याचे पाप भाजपला झाकता येणार

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१४ सालापासून देशात लोकशाही आणि संविधानाला पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने तसेच हुकुमशाही वृत्तीने भाजपचे सरकार काम करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अनैतिक तसेच असंविधानिक मार्गाने राज्याची सत्ता मिळवण्याचे पाप भाजपाने केले आहे. पत्रकारांना ढाब्यावर चहापाणी देऊन भाजपला अनैतिक मार्गाने सत्ता मिळवण्याचे आणि चालवण्याचे पाप झाकता […]Read More

राजकीय

आमदार अपात्रता सुनावणी आता पुढील महिन्यात

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सुरू असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजपासून पुन्हा सुरू झाली असून त्याची पुढील सुनावणी पुढच्या महिन्यात तेरा तारखेला होणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यावेळी पक्ष प्रमुख असणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी नेमलेल्या पक्ष प्रतोदाचा पक्षादेश अर्थात व्हीप नाकारल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र […]Read More

पर्यावरण

मानवाच्या जीवनात नदीचे असलेले महत्त्व छायाचित्रांतून स्पष्ट

पुणे, दि.२५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्येक नदीच्या काठावर एक संस्कृती आहे. प्रत्येक नदीसोबत एक पारंपरिक कथा आहे; परंतू आता काळानुरूप तिचे महत्त्व कमी झाले आहे. या प्रदर्शनात पुण्यातील नदीकाठांवर असलेल्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांचे अतिशय सुंदर, सुरेख, सर्वसामान्य जनतेला नदीचे महत्व समजेल अशी छायाचित्रे रेखाटलेली आहेत. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व […]Read More

राजकीय

आमच्याशी आघाडी करण्यात काँग्रेसला रस आहे का ?

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसला आमच्यासोबत आघाडी करण्यात रस आहे का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे .या पत्राच्या उत्तराची प्रतीक्षा ॲड. प्रकाश आंबेडकर करत आहेत; उत्तर देण्यासाठी आणखी 7 दिवस देऊ अन्यथा सर्व 48 जागांवर निवडणूक लढवू असेही या पत्रात पुढेम्हटले आहे. १ सप्टेंबर […]Read More

पर्यटन

मिनी महाबळेश्वर असलेला, सौताडा धबधबा ओसंडून वाहू लागला

बीड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा सौताडा येथील विंचरणा नदीचा रामेश्वराच्या खोल दरीत पडणारा धबधबा गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने वाहू लागला आहे. चार दिवसा पासून सुरु झालेल्या पावसाने धबधब्याचे रौद्ररूप पर्यटकांना पहावयास मिळाले. मराठवाड्याचा अर्धअधिक भाग सुजलाम सुफलाम करणाऱ्या मांजरा ,सिंदफना,विंचरणा ,बिंदुसरा , डोमरी या नद्यांचे […]Read More

पर्यटन

कोकणवासियांचा परतीचा प्रवास खड्ड्यांतूनच, महामार्गावर वाहनांच्या रांगा

अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणवासियांचा महत्त्वाचा असा सण मानला जाणाऱ्या गणेशोत्सवाचा सण उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करुन पुन्हा: एकदा कोकणवासियांचा परतीचा प्रवास हा खड्ड्यांतूनच झाला. त्यातच पावसाने देखील दमदार हजेरी लावल्यामुळे आणि रस्त्यांवरील प्रचंड खड्ड्यांमुळे या प्रवासात मोठ्या प्रमाणात अडथळे झालेले दिसून आले. या प्रवासात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून […]Read More