Month: September 2023

विदर्भ

नागपुरात काल पासून पावसाची संततधार

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात कालपासून पावसाची संततधार सुरू असून पेंच तोतलाडोह आणि नवेगाव खैरी धरणांचे दरवाजे उघडले आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता दिला आहे. संततधार पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी देखील […]Read More

विदर्भ

सततच्या पावसाने गोसीखुर्द चे दरवाजे पुन्हा उघडले

भंडारा, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान खात्यातर्फे भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत पावसाने सकाळपासूनच सुरूवात केलेली आहे. रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये कधी कधी मुसळधार पाऊस ही बरसतो आहे. तान्हा पोळ्याच्या उत्साहावर या पावसामुळे विर्जन पडला असला तरी या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत […]Read More

महानगर

मुंबई विमानतळावर कोसळले चार्टर्ड विमान

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत आज सायंकाळी ५ च्या सुमारास लिअरजेटचे एक विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर या विमानाने पेटही घेतला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, वैझाग ते मुंबई हे लिअरजेटचे विमान मुंबईत मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले.यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. खराब हवामान होतं. त्यामुळे लँडिंग करत असताना […]Read More

ट्रेण्डिंग

मुंबईतील सर्वांत महागडा जमिन विक्री व्यवहार, या कंपनीने केली खरेदी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईमध्ये जमिनीच्या इंचाइंचाला सोन्यापेक्षा जास्त भाव आहे असे म्हणतात. येथील धनिकांचे कोट्यवधी रुपयांचे भूखंड व्यवहार सर्वसामान्यांना अचंबित करतात. आता मुंबईमध्ये आजवरचा सर्वांत महागडा मानला जाणारा जमिन व्यवहार होत असल्याची माहिती समोर येत आहे. हा व्यवहार तब्बल 5200 कोटी रुपयांमध्ये होत आहे.मुंबईोतील वरळीमध्ये ही जबरदस्त डील झाली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

२०० मेगापिक्सलचा जबरदस्त कॅमेरा असलेला हा फोन झाला लाँच

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Honor कंपनीने आज भारतात आपला Honor 90 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. तसेच अल्ट्रा वाइड अँगलसह १२ मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा फ्रंट […]Read More

ट्रेण्डिंग

INDIA आघाडीने टाकला १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्राती ल मोदी सरकारविरुद्ध देशव्यापी संघटन करू पाहणाऱ्या इंडिया आघाडीने देशातील १४ न्यूज अँकर्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील बहुतांश माध्यमे भाजपला विकली गेली आहेत.इथे फक्त मोदी सरकारचे गोडवे गायले जातात. सरकारच्या दुटप्पीपणाला विरोध केला जात नाही. काही माध्यम संस्था पक्षपाती बातम्या दाखवतात. तसेच त्यांचे वार्तांकन पक्षपाती […]Read More

सांस्कृतिक

दोन दिवसीय हिन्दी राजभाषा संमेलनास झाली सुरूवात

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी भाषा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिक असून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यामध्ये भारतीयांनी कुठेही कमी पडू नये आणि या भाषेला जगाच्या स्तरावर नेण्याकरता सर्वानीच पुढे आले पाहिजे असा सूर पुण्यात सुरु असलेल्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात आज उमटला. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आजपासून दोन दिवसीय राजभाषा संमेलनास […]Read More

सांस्कृतिक

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायकायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी […]Read More

महानगर

“स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार धोरण” या विषयावर परिसंवाद

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.०० वा., कक्ष क्रमांक १४५, पहिला मजला, विधान भवन, मुंबई येथे “स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार तसेच हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादास प्रमुख पाहुणे म्हणून […]Read More

ट्रेण्डिंग

बैलांची छान सजावट करुन काढली डीजेच्या तालावर मिरवणूक…

नाशिक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात खेड्यापाड्यात आज शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला बैलपोळा सण साजरा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा निस्सिम मित्र म्हणून बैलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानानामुळे या मित्रांचे शेतातील अस्तित्व हळूहळू कमी होत आहे. तरीही काही शेतकऱ्यांना या प्राण्याबद्दल आस्था असल्याने ते त्यांची आदरपूर्वक पालनपोषण करतात. अगदी आपल्या मुलांप्रमाणे त्यांची काळजी […]Read More