Month: August 2023

कोकण

कोकणातील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट

सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटीकरण तसेच सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकांच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात […]Read More

मराठवाडा

गाव पंधरा दिवसापासून अंधारात; सरपंच, उपसरपंच पाण्याच्या टाकीवर

बीड, दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील सोनेसांगवी (सुर्डी) गावात पंधरा दिवसापासून लाईट नसल्याने सरपंच आणि उपसरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत लाईट सुरळीत चालू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनात सरपंच मुकुंद कणसे, उपसरपंच राहुल […]Read More

कोकण

धामापूर सड्यावर आढळले शिकारीचे कातळशिल्प, गुहा आणि दगडी हत्यारे

सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली. साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

दारुगोळा कारखान्या तर्फे दारुगोळा आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आझादी का अमृत महोत्सव हा देशाची 75 वर्षांची प्रगती, इथली संस्कृती, लोक, त्यांचे कर्तृत्व आणि इथल्या गौरवपूर्ण इतिहासाचा सन्मान दर्शविण्यासाठी दारूगोळा कारखान्याकडून दारूगोळा आणि शस्त्रास्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर संरक्षण मंत्रालयातर्फे विविध शस्त्रास्त्र प्रदर्शने आयोजित केली जाणार आहेत.यामध्ये नागरिकांना देशाची संरक्षण सिध्दता पहाण्याची […]Read More

महानगर

मुंबईतील पहिलीच मेट्रो बंद होण्याच्या मार्गावर…

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत सुरू झालेली पहिली मेट्रो वाहिनी घाटकोपर ते वर्सोवा ही बंद पडण्याच्या मार्गावर असून ती चालवणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी अनेक कारणाने रखडलेली ही मुंबईतील पहिली वहिली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. रिलायन्स infrastructure चा ७६ टक्के आणि एमएमआरडीए चा २४ टक्के असा यात […]Read More

महानगर

मुंबईतील पश्चिम – पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करा

मुंबई , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील टोल नाक्यावरील वसुली थांबवावी. राज्य सरकारने msrdc अंतर्गत असणारे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरचे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरित केले आहेत. मुंबई महापालिका या रस्त्यांची विशेष काळजी ( डागडुजी ) करत असताना. या रस्त्यांवरची टोल वसुली करत आहे.ही टोल वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी युवा सेना नेते […]Read More

सांस्कृतिक

श्रीरामाच्या मूर्तीसाठी विणले जातेय हातमागावर वस्त्र

पुणे , दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हॅन्डविविंग चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संयुक्त उपक्रम राबवित’दो धागे श्रीराम के लिए!’ हा वस्त्र विणण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर या कार्यात हातभार लागावा, अशी अनेक नागरिकांची ईच्छा असून त्यांनी यात भाग घेतला आहे . या अंतर्गत १० ते २२ […]Read More

देश विदेश

राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी राहुल यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत […]Read More

ट्रेण्डिंग

नेमाडे म्हणतात, औरंगजेब हिंदू द्वेष्टा नव्हताच

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इतिहासातील व्यक्तिमत्त्वांबाबत वादग्रस्त विधाने करत चर्चेृत राहण्याचा ट्रेंड सध्या राज्यभर सुरू आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना देखील हा मोह आवरता आलेला नाही. मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नेमाडे यांनी पेशव्यांसंबंधात अनुचित वक्तव्ये करत औरंगजेबाचे गोडवे गायले आहेत. सोशल मिडियावरून वाचक त्यांना टिकेला सामोरे […]Read More

ट्रेण्डिंग

डिजिटल वैयक्तिक डेटाचा गैरवापर केल्यास कोट्यवधींचा दंड

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार घोषित आज तब्बल सहा वर्षांनंतर आज लोकसभेत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक (Data Protection Bill) आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे.या विधेयकात ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे व्यक्तींच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत.यात दोषींना ५० कोटींपासून ते २५० कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची […]Read More