Month: August 2023

राजकीय

लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ ची लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आली असताना विरोधी पक्ष एकत्र येत सत्ताधारी भाजपला चांगलेच कोंडीत पकडत आहेत. मणिपूर हिंसाचारावरून देशभर सरकारवर टिका सुरू असताना लोकसभेत केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावावर विरोधक आणि सत्ताधारी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. यामुळे […]Read More

ट्रेण्डिंग

आमिर खानची लेक होणार मराठी घरची सून

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिस्टर परफेक्शनिस्टबॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा आता लवकरच विवाहबद्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयराच्या स्वपनातील हिरो आहे एक मराठमोळा फिटनेस ट्रेनर.त्यामुळे आता आयरा मराठी घरची सून होणार आहे.बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आमिरची लाडकी मुलगी इराने 18 नोव्हेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला.त्यानंतर आता हे […]Read More

ट्रेण्डिंग

इथे प्राण्यांनाही मिळते रविवारची सुट्टी

रांची, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात सर्वत्र रविवारचा दिवस ही हक्काची सुट्टी मानली जाते. सोमवार उजाडताच नोकरदार लोकं पुढच्या रविवारच्या सुट्टीची वाट पहायला सुरू करतात. पण माणसाला शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पाळीव पशुंच्या नशिबी अशी हक्काची सुट्टी असल्याचे फारसे आढळत नाही.कृषीप्रधान भारतात बैलपोळा सोडला तर मुक्या जनावरांना शेतीच्या कामातून फारशी सुटका नसते. बैलपोळ्याला देखील […]Read More

बिझनेस

टेस्ला कंपनीच्या CFO पदी भारतीय वंशाची व्यक्ती

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील सर्वांत मोठ्या कंपन्यांच्या वरिष्ठ पदांची सूत्रे अनेकदा भारतीय वंशीय हाती असल्याचे पहायला मिळते. आता यामध्ये अजुन एका कंपनीची भर पडली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी टेस्ला (Tesla) कंपनीची महत्त्वाची जबाबदारी भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हाती दिली आहे. एलॉन मस्क यांनी कार निर्माती कंपनी टेस्लाच्या CFO […]Read More

ट्रेण्डिंग

कोट्यधीश भारतीयांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशात सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना विरोधाभास म्हणजे देशातील कोट्यधीशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. वार्षिक एक कोटींपेक्षा अधिकची कमाई करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या दोन वर्षांत वाढली आहे. मार्च 2022 पर्यंत ही संख्या दुप्पटीने वाढली आहे. हा आकडा 1.69 लाखांवर पोहचला आहे. मुल्यांकन वर्ष 2022-23 च्या टॅक्स […]Read More

देश विदेश

लष्कराच्या ड्रोनमध्ये चिनी पार्ट्स वापरण्यास बंदी

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहमीच कुरापती काढत भारताला त्रस्त करणाऱ्या चीनपासून शक्य तेवढे सावध राहण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. देशांमधील तणावाचे वातावरण पाहता केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता चीनमध्ये बनवलेले पार्ट्स आता लष्करी वापरासाठी भारतात बनवलेल्या ड्रोनमध्ये वापरले जाणार नाहीत. केंद्र सरकारने यावर बंदी घातली आहे. अहवालानुसार, देशाच्या सुरक्षेशी […]Read More

ट्रेण्डिंग

अखेर बेस्ट कंत्राटी कामगारांचा संप मागे

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटीकामगारांनी पुकारलेला संप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळादरम्यान झालेल्या समाधानकारक चर्चेतून मागे घेण्यात आला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी सामावून घेणे, कायमस्वरुपी करून घेताना वयाची अट शिथिल करून सर्व प्रवर्गासाठी वय ५० वर्षे करावे, ज्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी […]Read More

आरोग्य

साथरोग नियंत्रण बैठकीत आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण […]Read More

महानगर

काँग्रेसच्या राज्यभर पदयात्रा आणि बसयात्रा

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट […]Read More

महानगर

विजय वैद्य यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई मराठी पत्रकार संघाचा २०२३ चा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आज जाहीर झाला आहे. यंदा आचार्य अत्रे यांची १२५ वी जयंती असून ऑगस्ट महिन्यात महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार विजय वैद्य यांना प्रदान करण्यात येणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कार […]Read More