Month: July 2023

राजकीय

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विधिमंडळात निवेदन केले. फिरता निधी दुप्पट आपल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले […]Read More

राजकीय

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली वाढीव दराने मदत

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार , टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ […]Read More

महानगर

तानसा पाठोपाठ मोडक सागर धरण भरले

ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी शहापूर तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे मोडक सागर धरण काल रात्रीनंतर तुडुंब भरून वाहू लागले. https://youtu.be/sx9gN1UTz_Q काल रात्री ठीक 10:52 वा. मोडक सागर धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे उघडले असून 6000 क्यूसेक ने वैतरणा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वैतना नदीच्या परिसरातील […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रात आतापर्यंत पाच आयसिस दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NIA ने महाराष्ट्र ISIS मॉड्युल प्रकरणी आणखी एकाला अटक केली असून यामुळे महाराष्ट्रातून अटक झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 5 पर्यंत पोहोचली आहे. NIA ने कोंढवा, पुणे येथून छापे टाकून डॉ. अदनानली सरकार (४३) याला अटक करण्यात आली. एनआयएने सरकारच्या कोंढवा घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि ISIS शी संबंधित […]Read More

ट्रेण्डिंग

उच्चांकावरून सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरगुंडी

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज शेअर बाजारातील घसरणीचा गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल (Market Capital) घटले. आजच्या व्यवहारानंतर बाजार भांडवल 303.59 लाख कोटींवर आले. बुधवारी, बाजार भांडवल 303.92 लाख कोटी इतके होते. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्ती 33 हजार कोटींची घट झाली.नफावसुलीमुळे शेअर बाजार घसरणीसह (Share […]Read More

ट्रेण्डिंग

सर्वोच्च न्यायालयाने अखेर इडी च्या संचालकांना दिली मुदत वाढ

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयात मंजूर करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 15 सप्टेंबरपर्यंत या पदावर कायम राहण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कोर्टाने असेही म्हटले आहे की, सामान्य परिस्थितीत याला परवानगी नाही, पण जनहितासाठी आम्ही ते मान्य करतो, […]Read More

ऍग्रो

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जारी

नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. राजस्थानमधील सीकर येथून देशभरातील 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करण्यात आला. 14वा हप्ता म्हणून 17 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी […]Read More

देश विदेश

या आफ्रिकन देशात लष्करी उठाव

निएमे, नायजर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम आफ्रिकेतील नायजर या देशात लष्करी उठाव झाला असून सशस्त्र सैनिकांनी राष्ट्रपती भवनात घुसून त्याचा ताबा घेतला. राष्ट्रपती मोहम्मद बज्मे यांना सत्तेवरून हटवून तुरुंगात टाकण्यात आले आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने राष्ट्रीय टीव्हीवर सत्तापालटाची घोषणा केली. कर्नल अमादौ अब्द्रामाने इतर लष्करी अधिकार्‍यांसह टीव्हीवर दिसले आणि राष्ट्रपतींना […]Read More

राजकीय

राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस; पेरण्या ८५ टक्के

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे […]Read More

बिझनेस

पहिला महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार रतन टाटा यांना

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार स्थापन केला असून हा पहिलाच पुरस्कार जेष्ठ उद्योजक रतन टाटा यांना देण्याचा निर्णय झाल्याची माहिती अशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत दिली. यासह तरुण, महिला आणि मराठी उद्योजकांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, यामुळे उद्योग जगतात महत्वाचं स्थान अधोरेखित होईल असं […]Read More