Month: July 2023

राजकीय

उपसभापतीना पदावरून दूर करा,राज्यपालांकडे मागणी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : विधानरिषदेतील उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे, त्यांना पक्षाने निलंबित केले आहे त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून दूर करावे अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने आज राज्यपालांकडे करण्यात आली आहे, दुसरीकडे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव ही दाखल करण्यात आला आहे. आज विधानरिषदेत त्यांना पदावर बसण्याचा […]Read More

महानगर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 20 जुलै रोजी मंत्रालयावर महामोर्चा

मुंबई दि.17( एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील गायरान धारक व मुंबईतील एसआरए आणि बीडीडी चाळीतील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार 20 जुलै रोजी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे,अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सर्वांसाठी घरे – 2024 हे धोरण धाब्यावर बसवून […]Read More

राजकीय

बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा …

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काहीजणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे, औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज […]Read More

राजकीय

विधानरिषदेच्या उपसभापतीना अपात्र करण्याची मागणी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेत आज पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करून देण्यात आला.मात्र यानंतर विरोधकांनी उपसभापती नीलम गोर्हे यांच्या पक्ष बदलावरून गदारोळ करत सभात्याग केला. शेकापचे जयंत पाटील यांनी सभापतींना कोणताही पक्ष नसतो असं सांगत हा मुद्दा मांडायचा प्रयत्न केला यावरून विरोधक आक्रमक […]Read More

महानगर

राष्ट्रवादी आमदारांची आज पुन्हा पवार भेट

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर काल पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती आणि आज पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी त्यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लागोपाठ दोन दिवस या भेटी झाल्या . पक्षात फूट पडू नये तो […]Read More

महानगर

राज्यात पावसाने ओढ दिली, पेरण्या खोळंबल्या, विरोधकांनी केला सभात्याग

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस नाही , पेरण्या केवळ वीस टक्के झाल्या आहेत , अनेक ठिकाणी बोगस बियाणे मिळतंय , सरकारचा वचकच राहिला नाही, दिल्लीत जाण्यात त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतेय , त्यावर तातडीने चर्चा करावी , असा स्थगन प्रस्ताव काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत मांडला.अध्यक्षांनी त्याला अनुमती नाकारली […]Read More

ट्रेण्डिंग

चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव उत्साहात साजरा

अमरावती, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्य़ातील थंड हवेच्या ठिकाणासह पावसाळी पर्यटन स्थळ ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून चिखलदऱ्याची ओळख निर्माण व्हावी यासाठी दोन दिवसीय ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. मान्सून पर्यटन महोत्सवामुळे येथील कोरकू आदिवासी बांधवांची संस्कृती, जीवनमान, खाद्य पद्धतींची माहिती जाणून घेता आली, असे मत म्हाडाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी […]Read More

विदर्भ

गोसेखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडले…

भंडारा, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच आज गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 ही दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. अर्धा मीटरने उघडलेल्या या दारामधून 1 लाख 31 हजार 881 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीकाठांच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्याला आज आणि उद्या दोन्ही दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्यातर्फे घोषित […]Read More

राजकीय

गडकरी धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत …

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बेंगळुरू दहशतवादी हल्ल्यातील दोषी अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले असून त्याचा 4 दिवसांचा PCR घेण्यात आला आहे.. दहशवादी अफसर पाशा हा यापूर्वी दोनदा नागपुरात आला होता. पाशाच्या नागपूर भेटीमागील कारण शोधण्यासाठी पोलीस त्याची चौकशी करत […]Read More

गॅलरी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात

मुंबई दि १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या सन २०२३च्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ होत आहे. विधानभवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ML/KA/SL17 July 2023Read More