Month: July 2023

मराठवाडा

पावसामुळे नांदेड जिल्ह्यात शाळांना आज सुट्टी

नांदेड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात एलो अलर्ट जारी केला आहे. नांदेड जिल्ह्यात काल रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे जिल्हातील पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिले ते दहावी च्या सर्वच शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा जोर वाढल्याने काल शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा […]Read More

महानगर

मणिपूरच्या घटनेवरून विधिमंडळात गदारोळ, विरोधक आक्रमक

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मणिपूर च्या महिला बलात्कार आणि धिंड या घटनेवर सभागृहाने ठराव केला पाहिजे अशी मागणी आज काँग्रेसच्या सदस्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच आक्रमकपणे केली, विधान परिषदेतही विरोधक आक्रमक झाले होते. विधानसभेत या मागणीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तुम्ही ठराव माझ्याकडे सादर करा मग निर्णय घेतो असं म्हटलं. मात्र […]Read More

महानगर

महापालिकांची आर्थिक स्थिती तपासूनच मालमत्ता कर माफी

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत त्या-त्या महापालिकांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं, ते याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देत होते.  मुुंबई महापिलकेेचा कायदा वेगळा आहे. त्यामुळे मुंबईप्रमाणे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय इतर […]Read More

पर्यटन

पुढील वर्षापासून राज्यभरात विमानसेवा सुरू

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या मुंबई विमानतळावरून वेळा मिळणं कठीण आहे मात्र नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील वर्षी तयार झाल्यावर ही सेवा सुरू केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर दिली. राज्यात ३२ विमानतळे आहेत त्यातील ११ वरून वाहतूक सध्या होऊ […]Read More

कोकण

सिंधुदुर्गात पाऊस मंदावला

सिंधुदुर्ग, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल दुपारनंतर पाऊस अक्षरशः कोसळत होता . मुसळधार कोसळणाऱ्या या पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर तसेच कोकण रेल्वे वाहतुकीलाही बसला.आज मात्र वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे .आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे . आज सकाळी आठ वाजता नोंद झाली. गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सरासरी […]Read More

महाराष्ट्र

यवतमाळ सर्वदूर संततधार पाऊस

यवतमाळ , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात आज सकाळपासूनच संततदार पावसाला सुरुवात झाली आहे .पाऊस संपूर्ण जिल्हाभर पडत असून अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे .त्यामुळे काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.तर अनेक लघु तथा मध्यम प्रकल्प आजच ओव्हरफ्लो झाले आहेत. बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून धरणाखालील गावातील लोकांना सावधानतेचा […]Read More

राजकीय

राज्यात ६६१ शाळा अनधिकृत, त्यात १६० मदरसे

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ६६१ अनधिकृत शाळा असून ज्या संस्थांनी कागदपत्रे पूर्णतः सादर केली आहेत मात्र ज्यांना जागेची अडचण येत आहे त्यांना कायद्यात बदल करण्याचा विचार करून परवानगी दिली जाईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ६६१ अनधिकृत शाळांपैकी ३७८ शाळा अद्याप सुरू असून बाकीच्यांना दंड […]Read More

कोकण

ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली.

अलिबाग , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली आहे. गेल्या ३ ते ४ दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाउस पडत असून वादळवाराही मोठ्या प्रमाणात सुटला आहे. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. मात्र सतत पडणारे पाउस व वादळवारा यामूळे उरणमधील ऐतिहासिक दृष्ट्या […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगा इशारा पातळीकडे:69 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात पावसाचं धुमशान सुरूच आहे. पात्रा बाहेर पडलेली पंचगंगा आता इशारा पातळीकडे वाटचाल करीत आहे. गेल्या 24 तासात पंचगंगेची पातळी सहा फुटांनी वाढली आहे. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ती 35 फुटांवर पोहोचली होती. इशारा पातळी 39 फुटांवर आहे.जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 200 हून […]Read More

Uncategorized

तुळशी तलाव ओव्हरफ्लो

मुंबई दि.20( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी तुळशी तलाव आज मध्यरात्री दीड वाजता ओसंडून वाहू लागला आहे . मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी यंदाच्या पावसाळ्यात भरुन वाहू लागलेला तुळशी हा पहिला तलाव ठरला आहे. विशेष म्हणजे मुंबई शहरात असणाऱ्या व पिण्याच्या […]Read More