Month: July 2023

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे . धोका पातळी 43 फूट इतकी आहे. सकाळी सात वाजेपर्यंत 39 फूट चार इंच इतकी पंचगंगेची पाणी पातळी होती. पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्यानं संभाव्य महापुराच्या धोक्यानं शहरातील तसेच ग्रामीण भागातील पूरप्रवण भागातील नागरिक […]Read More

Uncategorized

यवतमाळ जिल्ह्यात ढगफुटी, २८० लोकांचे स्थलांतर

यवतमाळ , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परवापासून जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे हाहाकार झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या एकूण २८० नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. तर ५३१७ नागरिकांना तात्पुरत्या निवारागृहात हलवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर बचाव कार्य […]Read More

Uncategorized

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू , सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे . यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांची स्थिती समाधानकारक झाली आहे. 16 लघुपाटबंधारे तसेच 3 मध्यम पाटबंधारे प्रकल्प धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे . आंतरराज्य तिलारी मुख्य धरणाचा कालपासून सांडवा प्रवाहीत झाला आहे. Water discharge from Tilari dam has started, alert […]Read More

महानगर

मालवाहू जहाज वडराई समुद्रात अडकले

पालघर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालघर जिल्ह्यातल्या वडराई समुद्रात मालवाहू जहाज इंजिन मध्ये बिघाड झाल्यानं बंद पडून अडकलं आहे. मुंबई पोर्ट/बंदर इथून सी सिध्दी नावाचं हे मालवाहू जहाज हाजीरा पोर्ट-गुजरात इथं जाण्यासाठी निघालं होतं. मात्र आज १ वाजताच्या दरम्यान या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं ते सातपाटी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या वडराई सुमद्र जेटी […]Read More

देश विदेश

जागतिक दिव्यांग तिरंदाजी स्पर्धेत पदकांची कमाई

नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): झेक रिपब्लिक मध्ये पिलसेन इथे सुरु असलेल्या जागतिक दिव्यांग तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय संघानं 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 3 पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचा आज शेवटचा दिवस असून भारताचे या स्पर्धेतले सर्व सामने आता संपले आहेत. Earning medals in World Paralympic Archery Championships जी […]Read More

कोकण

इर्शांलवाडी शोधकार्याला पूर्णविराम ,२७ मृत्यू , ५७ बेपत्ता घोषित

अलिबाग, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गेले चार दिवस सुरू असलेले रायगड जिल्ह्यातील इरशालवाडी येथील दुर्घटनेतीलशोधकार्य रविवारी संध्याकाळी पूर्णविराम देण्याचा निर्णय रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. Irshanlawadi search operation called off, 27 dead, 57 missing declared दुर्घटनेत 57 जण बेपत्ता असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. बुधवार रात्री सव्वा अकरा दरम्यान इर्शांळवाडीवर दरड […]Read More

मराठवाडा

कृषीमंत्री धनंजय मुंडे गोगलगायी साठी पोहोचले बांधावर

बीड , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली . गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे […]Read More

महानगर

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडीहून […]Read More

कोकण

ईर्शाळवाडीचे ग्रामस्थाना केले अत्यावश्यक दाखल्यांचे वाटप

अलिबाग , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुर्घटनाग्रस्त ईर्शाळवाडीचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून पावसाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या सर्व कुटुंबाना अत्यावश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी आजपासून तात्पुरते निवारा केंद्र येथे शिबीर लावण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत […]Read More

Lifestyle

परफेक्ट भात शिजवण्याची योग्य पद्धत

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय घरांमध्ये तांदूळ भरपूर बनवला जातो, अनेक घरांमध्ये भात जवळजवळ दररोज खाल्ला जातो. तांदूळ जेवणाची चव वाढवतो आणि तो डाळींबरोबरच भाज्यांसोबतही खाऊ शकतो. जर तुम्ही स्वयंपाक शिकत असाल आणि भात बनवताना कधी कोरडा तर कधी खूप ओला झाला असेल तर आमची नमूद केलेली रेसिपी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. […]Read More