Month: July 2023

ट्रेण्डिंग

ट्विटरची चिमणी पुन्हा बदलली, हा आहे नवीन लोगो

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता तर मस्क यांनी ट्विटरचा पूर्ण कायापालट केला आहे.ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली असून आता इलॉन मस्क ट्विटरचा नवा लोगो X आहे. एलन मस्कने ट्विटरचे नाव आणि लोगो देन्ही बदलले आहेत. आता ट्विटर […]Read More

राजकीय

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या माध्यमांसाठी धोरण

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :डिजिटल माध्यमांवर महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत बसवून कठोरात कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने, निश्चित धोरण ठरवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या संकेतस्थळांवर […]Read More

महानगर

तोपर्यंत गौतम अदानी यांना धारावीत पाय ठेवू देणार नाही

मुंबई दि.24( एम एमसी न्यूज नेटवर्क) : धारावी प्रकल्पाला आमचा विरोध नसून धारावीकरांचे धारावी मध्येच पुनर्वसन झाले पाहिजे, सर्वांना ४०५ चौरस फुटाचे निशुल्क घर द्या आणि ,धारावी पुनर्विकास प्रकल्पाला परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या ,अशी मागणी करत ,जो पर्यत धारावीतील रहिवाशांच्या मागण्या होत नाही तोपर्यंत गौतम अदानी यांना धारावीत पाय ठेवू देणार […]Read More

राजकीय

पुराच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात केली. राज्य आपत्ती प्रतिसाद मदतनिधीच्या निकषांमध्ये दुकानांसाठी मदत अनुज्ञेय […]Read More

देश विदेश

संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन

पुणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१ वर्षे) यांचे सोमवार आज पहाटे बंगळुरू येथे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (२५ जुलै) रोजी सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देवी […]Read More

राजकीय

निधीच्या वाटपात अजिबात भेदभाव नाही

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निधीच्या बाबतीत कुठल्याच मतदारसंघावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत विरोधकांचे असमान निधी वाटप होत असल्याबद्दलचे आरोप फेटाळून लावले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षात विरोधी पक्षाच्या आमदारांना एकही रुपयाचा निधी मिळाला नाही याकडे त्यांनी लक्ष वेधलं, मात्र आमचं सरकार अशाप्रकारे भूमिका […]Read More

राजकीय

बांधकाम कामगारांच्या जेवण आणि साहित्य यातील भ्रष्टाचाराची चौकशी

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलं जाणारं मध्यान्ह भोजन आणि त्यांना दिलं जाणारं सुरक्षा साहित्य यांच्या वाटपात तसेच दर्जाबाबत असलेल्या तक्रारींवर कामगार आयुक्तांच्या मार्फत उच्च स्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा मूळ प्रश्न कैलास घाडगे पाटील यांनी उपस्थित केला होता, त्यावर […]Read More

महानगर

प्रथा, परंपरा यांच्या नावाखाली धुडगूस चालणार नाही

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्माधर्मांमध्ये सौहार्द वाढवणाऱ्या कोणत्याही श्रद्धा आणि परंपरा पाळण्यासाठी सरकारची मनाई नाही मात्र या प्रथा परंपरांच्या नावाखाली धुडगूस घालता येणार नाही असा इशारा आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिला. प्रथा परंपरांच्या नावावर खोडसाळपणा होत असेल आणि विनाकारण धार्मिक तेढ निर्माण होत असेल तर दोन्ही बाजू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

सहाय्यक आयुक्ताने पत्नी, पुतण्याला मारून केली आत्महत्या…

पुणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवलं आहे. पुण्यातील बाणेर परिसरात मध्यरात्री 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड(वय 35) अशी गोळी झाडून […]Read More

कोकण

पावसाचा जोर अद्याप कायम; मात्र जनजीवन सुरळीत…

रत्नागिरी, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असला तरी जनजीवन मात्र सुरळीत सुरू आहे. खेड येथील जगबुडी आणि राजापूर येथील कोदवली नदी इशारा पातळीवर वाहत आहे. तर इतर नद्यांची पाणी पातळी सध्या सामान्य आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी परिसरात सायंकाळी ४ तासात ७४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे वशिष्ठी नदीची नाईक पुलाजवळील पाण्याची […]Read More