Month: May 2023

देश विदेश

आता वंदे भारत ईशान्य भारतातही

नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रेल्वेच्या इतिहासात अद्ययावत तंत्रज्ञान आणि तत्परसेवा यांसाठी अल्पावधितच प्रवाशांच्या मनात स्थान मिळवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईशान्येकडील पहिल्या आणि देशातील 19व्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सामील झाले. ही ट्रेन आसाममधील गुवाहाटी ते […]Read More

क्रीडा

आंदोलनकर्त्या कुस्तीपटुंवर गुन्हे दाखल

नवी दिल्ली, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला कुस्तीपटूंनी डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे आणि त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 23 एप्रिलपासून ते धरणे आंदोलन करत आहेत.दिल्लीतील नवीन संसद भवनासमोर रविवारी महापंचायतीसाठी गेलेले पोलिस आणि कुस्तीपटू यांच्यात हाणामारी झाली. पोलिसांनी महापंचायतीला परवानगी दिली नव्हती. नवीन संसदेपर्यंत पोहोचण्यासाठी कुस्तीपटूंनी बॅरिकेड्सही तोडले. त्यांची पोलिसांशी झटापट […]Read More

पर्यावरण

नागपूरात आजही पाऊस, अनेक झाडांची पडझड

नागपूर दि २९– हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज नागपूर शहरातील विविध भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. नवतपा सुरू असतांना आज नागपूर शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी चांगले ऊन पडले असतांना दुपारच्या सुमारास पावसाने नागपूर शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात पाऊस झाला. गेल्या तीन दिवसांपासून नागपूर शहरात दररोज […]Read More

विज्ञान

ISRO कडून या नेव्हिगेशन सॅटेलाइटचे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आज नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 चे प्रक्षेपण केले. जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेइकल ( GSLV-F12) द्वारे हा उपग्रह अवकाशात पाठवण्यात आला. हा उपग्रह 2016 मध्ये प्रक्षेपित केलेल्या IRNSS-1G उपग्रहाची जागा घेईल. IRNSS-1G उपग्रह हा इस्रोच्या प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली NavIC (नाविक) चा सातवा उपग्रह आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश […]Read More

महानगर

सोनवणे कुटुंबाला लागले ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे वेध

उल्हासनगर दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगरमध्ये राहणारे सोनवणे कुटुंब हे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचे जिवंत उदाहरण असुन आई ब्लॅक बेल्ट कराटे चॅंपियन तर त्यांची दोन्ही मुले ही वेट लिफ्टींग मध्ये तरबेज असुन त्यांचा आता ऑलिंपिक मध्ये खेळण्याचे वेध लागले आहेत. उल्हासनगर मध्ये सोनवणे कुटूंब राहत असुन त्यांच्या दोन मुलानी महाराष्ट्र सरकार, क्रीडा संचालनालय यांच्या संयुक्त […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

मराठा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेत स्वेच्छा विलीनीकरण

मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क): काही तांत्रिक कारणामुळे अडचणीत सापडलेली मुंबई येथील मराठा सहकारी बँकेच्या सर्व सात शाखा आज पासून रिझर्व बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून ग्राहक सेवेत रुजू झाल्या आहेत. कॉसमॉस बँकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा आता या ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली. सी ए काळे यांनी […]Read More

Uncategorized

केंद्रातील सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी

मुंबई, दि.२९ – एमएमसी न्यूज नेटवर्क : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाही देशामध्ये शासन आणि धोरणे सर्वांचा विकास करणारी असायला हवीत परंतु गेल्या नऊ वर्षांत एनडीए सरकारने त्यासाठी काहीही केलेले नाही आणि केंद्र सरकार आपल्या चुका सुधारून जनतेसाठी सुशासन करण्याचा […]Read More

विदर्भ

इम्पॅक्ट बँरियरला कार धडकली.. दोघांचा मृत्यू …

बुलडाणा दि २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील दुसरवीड नजीकच्या देऊळगाव पोळ जवळ एक कार रस्त्या लगतच्या इम्पॅक्ट बॅरिअरला धडकली त्यानंतर या कारने पेट घेतला कार मधील दोघांचा भाजून जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे . त्यांना दुसरबीड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचाराग्रस्त दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

हत्तींचा पुन्हा धुमाकूळ, पिकांचे मोठे नुकसान…

कोल्हापूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हत्तींचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला असून त्यांनी इथल्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान सुरू केलं आहे. गेले अनेक दिवस हत्ती आजरा शहरानजीकच्या रामतीर्थ जंगल क्षेत्रात वावरत असून सायंकाळच्या वेळेला आजरा-साळगाव आणि आजरा-सोहळे मार्गावर वाहनधारकांना तो दर्शन देत आहे त्यामुळे नागरिकात घबराटीचं वातावरण निर्माण झाले आहे. वन […]Read More

देश विदेश

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे मानवरूपी कल्पवृक्ष

मॉरिशस, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “स्वातंत्र्यवीर सावरकर हे मानवरूपी कल्पवृक्ष होते. ज्याप्रमाणे एखाद्या कल्पवृक्षाची पाने, फुले, फळ, मुळं उपयुक्त असतात आणि त्या कल्पवृक्षाची सावलीही आपल्याला सुखद गारवा देते; त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर कल्पवृक्ष होते. स्वातंत्र्यवीर हे स्वातंत्र्यसैनिक, वकील, कवी, लेखक, साहित्यिक, तत्वचिंतक, समाजसुधारक, व्हिजनरी असे व्यक्तिमत्व होते. त्यामुळे सावरकर यांचे प्रखर विचार हे आजच्या […]Read More