Month: March 2023

Breaking News

राज्यात तीस मार्च पासून सावरकर गौरव यात्रा…

नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात येत्या 30 मार्च पासून ते 6 एप्रिल पर्यंत काढण्यात येईल. महाराष्ट्राच्या विविध विभागात आयोजित होणाऱ्या या गौरव यात्रा ची जबाबदारी भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या […]Read More

महानगर

कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एस्आयटी मार्फत चौकशी करा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी […]Read More

पर्यावरण

आफ्रिकेतून कुनोत आणलेल्या चित्त्याचा मृत्यू

भोपाळ, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेश राज्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृत्यू झालेल्या मादी चित्त्याचे नाव साशा होते व तिला किडनीचा विकार होता. यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांची […]Read More

राजकीय

आमदार शिरसाठ यांच्या विरोधात सुषमा अंधारे यांची महिला आयोगात धाव

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. गेल्या रविवारी म्हणजे २६ तारखेला छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गडकरी धमकी प्रकरणी जयेश पुजारीला अटक

कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना अधून मधून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असं धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.‘गुगल पे’वर […]Read More

ट्रेण्डिंग

अयोध्येच्या राम मंदिरासाठी बल्लारपूरचे सागवान लाकूड

चंद्रपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील बल्लारपूर येथून अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठविल्या जाणाऱ्या सागवान लाकडाची काष्ठपूजन झाल्यावर भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर- चंद्रपुरात जय्यत तयारी केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे लाकूड विक्री केंद्र आहे. राज्य शासनाच्या वनविभागाच्या वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य […]Read More

मनोरंजन

ही मालिका ठरली यावेळची टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनोरंजन विश्वात टीआरपीच्या बाबतीत कायमच चढ उतार चालू असतो. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. प्रेक्षकांचे मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील लक्ष लागलेले असते. त्याच्या चढ-उताराकडे लक्ष ठेवून प्रेक्षक बऱ्याचदा आवडीनिवडी बदलताना पण दिसतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या […]Read More

देश विदेश

इस्रोने एकाच वेळी केले ३६ उपग्रहांचे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरात मान्यता प्राप्त अशी भारताची इस्रो ही संस्था प्रगतीची शिखरे पार करत असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘एलव्हीएम३’ या सर्वात मोठय़ा प्रक्षेपणास्त्राच्या मदतीने ब्रिटनस्थित ‘वनवेब ग्रूप कंपनी’चे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. सर्व उपग्रह नियोजित कक्षेत स्थिर झाले असून त्यांच्याशी संपर्कही प्रस्थापित करण्यात आला आहे. ‘इस्रो’ची […]Read More

देश विदेश

लवकरच येणार ५० रुपयांचे टायगर कॉइन

नवी दिल्ली, दि. २७ : १ एप्रिल १९७३ रोजी केंद्र सरकार आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केला होता. यादेशात ‘प्रोजेक्ट टायगर’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारचे अर्थ मंत्रालय ‘स्मारण नाणे’ जारी करणार आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने सांगितले की, हे […]Read More

राजकीय

शिवसेना फोडल्यामुळे निष्ठावान शिवसैनिक भाजप विरोधात

जळगाव, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी […]Read More