Month: January 2023

कोकण

समुद्रात अखंड पोहण्याचा जागतिक विक्रम -11 दिवस,22 तास,13मिनिटे

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली वसई विरार ओपन वॉटर सी स्विमिंग फाऊंडेशनतर्फे अनोखी आणि साहसी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. १७ डिसेंबर २०२२ रोजी मुंबई ते गोवा आणि वसई किल्ल्यापर्यंत ११०० किमी अंतरावरील जगातील सर्वात लांब ओपन वॉटर सी स्विमिंग रिले ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या […]Read More

मनोरंजन

चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन

मुंबई, दि. 1 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :   प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक आणि लोकप्रिय मराठी चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर (८२) यांचं आज सायंकाळी ५ वाजता निधन झालं आहे.  गेले काही दिवस ते आजारी होते. चित्रपट सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवण्यात सुधीर नांदगावकर यांचं फार योगदान आहे.  त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार […]Read More

मराठवाडा

केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेड, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे आज निधन झाले . औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे […]Read More

मराठवाडा

राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबाद,दि. 1– सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आज झाले. या प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर […]Read More

ट्रेण्डिंग

जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत भीषण स्फोट, १७ जखमी, दोघांचा मृत्यू ..

नाशिक दि १- : नवीन वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये भीषण अपघात झाला. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल कंपनीत आज सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला, यामुळे कंपनीला आग लागली आणि त्यात चौदा कामगार जखमी झाले आहेत. या आगीने भीषण रूप धारण केले. या आगीच्या ज्वाला हवेत उंच पसरल्या , बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती […]Read More

विज्ञान

मारुत ड्रोनला कृषी ड्रोन म्हणून मान्यता

नवी दिल्ली,दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे कृषीक्षेत्र दिवसेंदिवस तंत्रज्ञानाच्यादृष्टीने प्रगत होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम वाचून अधिन उत्पादन मिळण्यास हातभार लागतो. केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याचे धोरण स्वीकारले आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर (Drone Technology) वाढत आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर वाढत आहे. DGCA ने नुकतीच आणखी एका ड्रोनला मान्यता दिली आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने…

नंदुरबार, दि. 1 (एमएमसी न्यूज ने) – नवीन वर्षाची आव्हाने पेलण्याची एक नवी उमेद साऱ्यांना लाभावी या उद्देशाने दरवर्षी नूतन वर्ष आरंभाला सूर्यनमस्कार घालून नववर्ष स्वागतचा अभिनव उपक्रम नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला जातो. सकारात्मक संस्कारांची रेलचेल व्यक्तिमत्वामध्ये बानवली पाहिजे या उद्देशाने या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने करण्याची प्रथा काही वर्षांपासून […]Read More

ऍग्रो

रब्बी हंगामातील पेरणी; सर्वाधिक पेरणी हरभरा; ज्वारीचं क्षेत्र घटले

बीड, दि 1  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यात ५४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी झाली असून सर्वाधिक पेरणी हरभरा तर ज्वारीचं क्षेत्र घटले आहे. यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतात पाणीसाठा मुबलक आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी ४२ हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरणी केली आहे. तर ६ हजार हेक्टरवर ज्वारी,३ हजार हेक्टरवर गहू आणि […]Read More

कोकण

कर्नाळ्यात दुर्मिळ ‘चेस्टनट विंग्ड कुक्कू’ चे दर्शन

पनवेल, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील विविध प्रजातीच्या पक्षांचे नंदनवन असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पहिल्यांदाच दुर्मिळ अशा ” चेस्टनट विंग्ड कुक्कू ” या पक्षाचे दर्शन झाले आहे. पक्षीनिरीक्षकांना कर्नाळा अभयारण्य परिसरात हा पक्षी आढळून आला. कोकिळेच्या या दुर्मीळ प्रजातीच्या पक्षाचे दर्शन होण्याची ही महाराष्ट्रातील तिसरीच नोंद असून कर्नाळा अभयारण्य […]Read More

खान्देश

श्री.क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर बंद

नाशिक, दि. 1 ( एमएमसी न्यूज नेटवर्क): बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर हे अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कारणासाठी दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे . त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, सदरचे संवर्धन काम हे भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात […]Read More