नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने…

 नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने…

नंदुरबार, दि. 1 (एमएमसी न्यूज ने) – नवीन वर्षाची आव्हाने पेलण्याची एक नवी उमेद साऱ्यांना लाभावी या उद्देशाने दरवर्षी नूतन वर्ष आरंभाला सूर्यनमस्कार घालून नववर्ष स्वागतचा अभिनव उपक्रम नंदुरबार येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला जातो.

सकारात्मक संस्कारांची रेलचेल व्यक्तिमत्वामध्ये बानवली पाहिजे या उद्देशाने या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत सूर्यनमस्काराने करण्याची प्रथा काही वर्षांपासून रूजविली असून एक चांगला पायंडा पडला आहे.

संस्कृत सूर्य श्लोकांच्या ध्वनिमध्ये सुमारे 600 विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले.

ML/KA/SL

1 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *