Month: December 2022

विदर्भ

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पंधरा हजाराचा बोनस देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली, विदर्भ मराठवाडा भागातील पश्र्नांवर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. या बोनसचा फायदा पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होईल आणि तो त्यांच्या खात्यात थेट […]Read More

बिझनेस

विदर्भ-मराठवाडा भागातील उद्योगांसाठी नवे ऊर्जा धोरण

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ मराठवाडा भागातील उद्योगांना वीज सवलत देण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येत असून राज्याच्या ३९,६०२ कोटींच्या ऊर्जा योजनेला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या विदर्भ मराठवाडा विकास चर्चेवर ते उत्तर देत होते.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी […]Read More

पर्यावरण

कोकणातील पश्चिम घाट बाधित ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव

नागपूर, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातील अनेक गावांना पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राने बंधनं आल्यामुळे त्याचे सूक्ष्म सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यातील एकूण ३८८ गावे वगळण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल अशी ग्वाही वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. भास्कर जाधव यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती, या संवेदनशील क्षेत्राने बाधित गावांचे रोजगार ठप्प झाले आहेत, […]Read More

करिअर

७५ हजारांची नोकरभरती एका वर्षात

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्यातील ७५ हजार पदांची सर्व नोकरभरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही प्रभारी मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केली होती. शिक्षण विभागाची भरती प्रक्रिया फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून त्यातील नेमणुका मार्च २३ पर्यंत देण्यात येतील, एम पी एस सी मार्फत […]Read More

विदर्भ

विदर्भाच्या विकासासाठी घोषणा नको तर कृती करा

नागपूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भाच्या सर्वंकष विकासासाठी फक्त घोषणा नको तर कृती होण्याची गरज आहे, त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व विदर्भावर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा असे प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विदर्भातील अनुशेषावर भाषण करताना केले. विदर्भ मराठवाड्याचा सातत्याने असणारा अनुशेष यावर चर्चा करत असतांना विदर्भाकडे होणारे दुर्लक्ष दूर […]Read More

क्रीडा

टी-२० संघातून विराट-रोहितला विश्रांती की हकालपट्टी?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंका संघाविरुद्ध आगामी जानेवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड काल जाहीर करण्यात आली. १६ सदस्यांच्या या संघाचे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. तर गेल्या वर्षभरात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळत सूर्यकुमार यादवची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या संघातून अनुभवी खेळाडू रोहित […]Read More

ट्रेण्डिंग

भारतात चार्जरबाबत तातडीने घेतले गेले हे निर्णय

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत सरकार मोबाईल आणि वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी दोन कॉमन चार्जिंग पोर्ट घोषित करण्याची योजना आखत आहे. विविध प्रकारच्या चार्जर्समुळे देशातील इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे प्रमाण वाढते, असे सरकारचे मत आहे. एक मोबाइल, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल आणि दुसरे वेअरेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन पोर्ट असेल. भारतीय स्टँडर्ड ब्युरोने USB […]Read More

गॅलरी

हा आहे धोनीच्या लेकीचा सिक्रेट सांता

दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : नुकत्याच कतार येथे पार पडलेल्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला.जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतात देखील अनेक फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाच्या विजयानं खुश झाले. आता फुटबॉल फीवर पासून भारतीय खेळाडूसुद्धा वेगळे राहू शकले नाही. पण यात एक पोस्ट खास लक्ष्यवेधी ठरली. फुटबॉल वर्ल्डकपमधील विजयानंतर मेस्सीच्या […]Read More

आरोग्य

राज्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचे निधन

मंडणगड, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंडणगड तालुक्यातील पाले या गावातील कोरोना बाधित रुग्णाचे दापोली येथे निधन झाले. यामुळे कोकणामध्येही कोरेनाने छुप्या पावलाने प्रवेश केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे अद्याप शांत असलेली स्थानिक आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पाले येथील संबंधित रुग्णाला दम्याचा त्रास झाल्याने तपासणीसाठी रुग्णालयात आला होता. मात्र त्यांची लक्षणे पाहून […]Read More

पर्यटन

हायवेवरील सुसाट वाहनांवर RTO ची करडी नजर

मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्षांच्या स्वागतासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना अनेकांनी प्रवासाचे बेत आखले असतील. मत्रा मजा मस्तीच्या मुडमध्ये वेगावर नियंत्रण न राहिल्याने आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळेच वेगमर्यादेचे उल्लंघन होऊ नये व नवीन वर्ष सुरक्षित जावे म्हणून आरटीओ सज्ज झाले आहे.  पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune Mumbai Express Highway) सुसाट वेगाने […]Read More