Milind

महानगर

भायखळा येथे श्री गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त झाले विविध कार्यक्रम

मुंबई, दि 22-निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या 69 पुण्यतिथी निमित्त भायखळा येथील श्री गाडगे महाराज धर्मशाळा येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी धर्मशाळेत राहणारे कॅन्सरग्रस्त व त्यांचे नातेवाईक यांना खाऊ, मिठाई आणि मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले , तसेच या ठिकाणी […]Read More

राजकीय

भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा मॉल – करुणा मुंडे

मुंबई, दि २२-: स्वराज्य शक्ती सेना पक्षाने मुंबईतील इतर सहा पक्षांशी आज आघाडी केली. मुंबई पालिका निवडणुकीत ६ जागांवर आपले उमेदवार उभे करणारा असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी आज सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. जो पर्यंत ईव्हीएमला विरोध आपण करत नाही, तो पर्यत भाजपाच सतेत येणार.भाजपा म्हणजे भ्रष्ट्राचाराचा […]Read More

राजकीय

नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक विजयी: हर्षवर्धन

मुंबई, दि २२- राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधा-यांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो […]Read More

महानगर

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटका

ठाणे,दि. २२:- एकविसाव्या शतकातही बंधबिगार पद्धती अस्तित्वात असल्याचे धक्कादायक वास्तव अंबरनाथमध्ये उघडकीस आले असून, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात नाल्सा (National Legal Services Authority) योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत मे. शक्ती फूड इंडस्ट्रीज कंपनी, अंबरनाथ पश्चिम या कंपनीत असलेल्या 10 परप्रांतियांची बंधबिगाराच्या विळख्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी […]Read More

राजकीय

काँग्रेस पक्ष नेहमीच उत्तर भारतीयांच्या पाठीशी सक्षमपणे उभा – खा.

मुंबई, दि २२- मुंबई महानगरपलिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. मुंबई काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलने सात कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये उत्तर भारतीयांच्या सन्मानाचे आणि स्वयंरोजगाराचे रक्षण करण्यासह अनेक प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. शारदा ज्ञानपीठ इंटरनॅशनल स्कूल, दत्त मंदिर रोड, मालाड (पूर्व) येथे आयोजित जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि […]Read More

महानगर

मंदिरांच्या भूमीवरील सर्व प्रकारचे शुल्क रद्द करा ! – मुख्यमंत्र्यांकडे

नवी मुंबई, दि २२- महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व मंदिरांच्या जमिनीवरील मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व इतर कर पूर्णपणे माफ करण्याची तसेच मंदिरांच्या जमिनींचे संरक्षण करण्यासाठी ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. तसेच बेलापूर येथे विभागीय कोकण आयुक्त श्री. विजय सूर्यवंशी यांना सुद्धा निवेदन […]Read More

महानगर

बांगलादेशातील हिंदू युवकाची अमानुष हत्या निषेधार्ह; जागतिक समुदायाने हस्तक्षेप करावा

मुंबई, दि २२-बांगलादेशातील मैमनसिंह येथे हिंदू युवक दीपु चंद्रदास याची जमावाकडून करण्यात आलेली अमानुष हत्या अत्यंत निंदनीय व अस्वीकार्य असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केले. कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली युवकाला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती देत त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.आलोक कुमार म्हणाले की, “सर्व देव वेगवेगळ्या […]Read More

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पार पाडण्यासाठी महानगरपालिका निवडणूक यंत्रणा

मुंबई, दि २२-बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः निर्भय, मुक्त, पारदर्शक तसेच शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणा कटिबद्ध आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सर्वतोपरी व व्यापक तयारी केली असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही […]Read More

आरोग्य

आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती: ‘ट्रूपिक हेल्थ’च्या माध्यमातून भारतात पहिल्यांदाच ‘बायोलॉजिकल

पुणे, दि २२: धावपळीची जीवनशैली, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीच्या आहारपद्धतीमुळे आजचा तरुण आणि मध्यमवयीन वर्ग विविध व्याधींच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि ‘रिस्टोरेटिव्ह हेल्थकेअर’ (पुनरुज्जीवन आरोग्य सेवा) क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ‘ट्रूपिक™ हेल्थ’ (Trupeak™ Health) सज्ज झाले आहे. आज पुण्यात एफसी रोड येथे या केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले. भारतात […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

शोभेच्या दारूच्या कारखान्यात भीषण स्फोट, दोघेजण गंभीर जखमी

सांगली दि २२ : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा जवळील भाळवणी गावात मुल्ला फायर वर्क्स या शोभेच्या दारूच्या कारखान्यात आज सकाळी दहा वाजता शोभेच्या दारूचा मोठा शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की याच्या आवाजाने भाळवणी गाव व त्याच्यापासून पाच किलोमीटरची जमीन हादरली. अनेक गाड्यांच्या काचांना तडे गेले तर गावातील घरामध्ये असणारी कपाटातील […]Read More