Month: January 2023

देश विदेश

या वर्षीच्या वर्ल्ड कप हॉकी साठी भारतीय संघ जाहीर

बंगळुरु, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिसामध्ये  13 जानेवारीपासून होणाऱ्या पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. यात 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ग्रुप D मध्ये भारताबरोबरच इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघाचा देखील समावेश आहे. भारतीय संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह करणार आहे तर अमित रोहिदास […]Read More

ट्रेण्डिंग

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची paytm FIRST GAMES ही जाहिरात बंद

मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क ): भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी पेटीएम फर्स्ट गेम’ ही जाहिरात केली.या जाहिराती- मुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात असून भारतरत्नचा अपमान होत आहे. त्यामुळे ही जाहिरात बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रीतेश पवार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली. भारतरत्न ही पदवी सहजासहजी कोणाला देण्यात येत नाही. भारतीय संविधानाचे […]Read More

ट्रेण्डिंग

मार्क झुकरबर्गच्या घरी तिसर्‍यांदा हलणार पाळणा…

(एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या घरी तिसऱ्यांदा पाळणा हलणार असल्याची माहिती मार्क झुकरबर्ग याने नवीन वर्षाच्या निमित्ताने पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे. 2023 हे वर्ष या जोडप्यासाठी खास आहे, कारण ते यावर्षात त्यांच्या घरी तिसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे. मार्क झुकरबर्गने इंस्टाग्रामवर […]Read More

ट्रेण्डिंग

डॉ. मीनाक्षी पाटील यांना रूपाली दुधगांवकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : शिवार चैरिटेबल ट्रस्ट, माथला ता. जिंतूर जि. परभणी यांच्यावतीने देण्यात येणारा ‘रूपाली दुधगांवकर राष्ट्रीय पुरस्कार- 2022 – हा, सुप्रसिद्ध कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना आज एका पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आला. डॉ. मीनाक्षी पाटील यांचे, पोएट्रीवाला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

खरी भीमशक्ती माझ्याकडे आहे…

सांगली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले तरीसुद्धा फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे आहे, शिवाय शिंदे यांच बंड मोठं आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये आठवले हे प्रसार माध्यमाशी बोलत होते. उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस […]Read More

Breaking News

कर्नल पुरोहित यांचा दोषमुक्तीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

मुंबई, दि.2( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याची निर्दोष मुक्त करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात २००८ मध्ये मोटारसायकलचा वापर करून मालेगाव मध्ये बॉम्बस्फोट घडवला गेला. ही गाडी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या नावावर होती. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चोखोबा ते तुकोबा समता वारीचे देहूकडे प्रस्थान

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजामध्ये समता, बंधुता आणि मानवता हे अधिक वृद्धिंगत व्हावे. यासाठी मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या पावन भूमीपासून संत तुकाराम महाराजांच्या देहू गावपर्यंत चोखोबा ते तुकोबा ही समतेची वारी निघाली आहे. चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे नुकतेच पंढरपुरातून देहूकडे प्रस्थान झाले. मंगळवेढा- पंढरपूर ते देहू असा 9 जिल्ह्यातून […]Read More

विदर्भ

नागपूरात शासकीय निवासी डॉक्टर संपावर

नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. नवीन वसतीगृह बांधून द्या, एक वर्षाच्या शासकीय बाँड बद्दलच्या अटीचा पुनर्विचार करा, वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात शिक्षकांची भरती करा, निवासी डॉक्टर्सना सातव्या वेतन आयोगाच्या दर्जानुसार विद्या वेतन द्या. अशा अनेक मागण्या पुढे करत आज राज्यभरातील निवासी डॉक्टर्स […]Read More

देश विदेश

नोटाबंदी योग्यच- सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली, दि.  2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केंद्र सरकारने 2016मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी केंद्राला चांगलेच घेरले होते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या 58 याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चीट दिली आहे. नोटाबंदीचा […]Read More

ट्रेण्डिंग

भारतात कृत्रिम हृदयाची निर्मिती यशस्वी

कानपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  नवीन वर्षानिमित्त भारतीय आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे संशोधन समोर आले आहे. आयआयटी कानपूर येथील संशोधकाना कृत्रिम हृदयाची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. संस्थेच्या 118 व्या स्थापना दिनानिमित्त हे हृदयाचे प्रदर्शन करण्यात आले. प्रा. अभय करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखाली 10 डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच्या गटाने या हृदयाची निर्मिती केली आहे. लवकरच या  प्राण्यांवर […]Read More