मुंबई दि.17(एम एमसी न्यूज नेटवर्क) : कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपावर मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आज सक्तवसुली संचालनालया (ईडी)कडून चार तास चौकशी करण्यात आली. कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडी कडे तक्रार केली होती. याबाबत चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली होती. त्यासंदर्भात जबाब […]Read More
अमरावती, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शतकोत्तर परंपरा लाभलेल्या अमरावती जिल्ह्यतील तळेगाव दशासर येथील शंकर पटाला नवी संजीवनी मिळाली असून तब्बल आठ वर्षानंतर पहिल्यांदा सर्जा राजाची जोडी यावर्षी पटावर धावली . तळेगाव दशासर येथील शंकर पट विदर्भात प्रसिद्ध आहे. न्यायालयाने बंदी घातल्यामुळे, हा शंकर पट बंद करण्यात आला होता. मात्र हा शंकर पट सुरू […]Read More
जालना, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील शाळेचे शिक्षक आणि पालकांच्या समन्वयातूनच शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचे धडे जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील दहीफळ भोंगाने पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना दिले जात आहेत. या शाळेच्या आवारातील परसबागेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलं सेंद्रिय भाजीपाला पिकवित असून, त्याचा शालेय पोषण आहारातही वापर केला जात आहे […]Read More
वाशिम, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंगरुळपीर शहरातील उर्स मिरवणुकीत पाकिस्तानी झेंडे औरंगजेबाचे फोटो झळकविल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात काल रात्री बाबा हयात कलदंर दर्ग्यातील उर्स निमित्त मंगरूळपीर शहरात मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या रॅलीत औरंगजेबाचे फोटो असलेल्या बॅनरसह पाकिस्तानचे झेंडे फडकविण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी दिल्ली येथील खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये दि. १७ ते २३ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. भारताकडून, पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन आणि सायना नेहवाल त्यांच्या उत्कृष्ट खेळाने स्पर्धेला शोभा देणार आहेत. स्पर्धेचे सर्व सामने नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये आयोजित केले जातील आणि […]Read More
काठमांडू, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमध्ये आज सकाळी यती एअरलाईन्सच्या ATR-72 या विमानाला भीषण अपघात झाला आहे. नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ प्रवाशांना घेउन जाणारे हे विमान अपघातग्रस्त झाला. या अपघातात ६८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५३ नेपाळी, ५ भारतीय, ४ रशियन,२ कोरीयन आणि प्रत्येकी एक आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स या देशांतील प्रत्येकी एका […]Read More
मुंबई, दि.15 (एमएमसी न्युज नेटवर्क) : मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळच्या (NTC) नऊ गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर खुला झाला आहे. म्हाडा मार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे. मुंबईतील मराठी माणसाला हक्काचे घर देणारी घोषणा आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. मुंबईत एनटीसीच्या एकुण 11 गिरण्या असून […]Read More
बुलडाणा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंती उत्सवाची सांगता 14 जानेवारीला महाप्रसादाने झाली . 250 क्विंटल पुरी आणि 250 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद एकाच वेळी 50 एकर शेतात बसलेल्या नागरिकांना 150 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2 हजार स्वंयसेवकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाढून करून महापंगतीला भोजन वितरित केले. स्वामी विवेकानंद यांच्या […]Read More
कोचीन, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने मासिक पाळी रजा मंजूर करण्याची घोषणा केली. मुलींना प्रत्येक सेमिस्टरमध्ये अनिवार्य ७५% उपस्थितीत २% सूट मिळेल. विद्यापीठात ८,००० विद्यार्थी आहेत, त्यापैकी निम्म्या मुली आहेत. मुलींना ही सवलत देणारे सीयूएसएटी देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नमिता जॉर्ज म्हणाल्या, विद्यापीठ व्यवस्थापनाने आमची […]Read More
मदुराई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये मदुराईच्या तीन गावांमध्ये आज मट्टू पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यासोबतच जल्लीकट्टूदरम्यान 19 जण जखमी झाले आहेत. अकरा जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जल्लीकट्टू हा एक असा खेळ आहे ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते. या खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना बैलाला धरून नियंत्रित […]Read More